परमेश्वर सोनावणे, प्रतिनिधी
उस्मानाबाद, 9 फेब्रुवारी: दरवर्षी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी तालुका आणि जिल्हास्तरावर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असेच आयोजन करण्यात आले आहे. उस्मानाबाद येथे दि. 10 फेब्रुवारी 2023 ते दि. 14 फेब्रुवारी 2023 दरम्यान महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या मार्फत तुळजाभवानी कृषी महोत्सव हा शेतकऱ्यांसाठी उपक्रम घेण्यात येत आहे.
कोरोनानंतर पहिल्यांदाच उस्मानाबाद जिल्ह्यात अशा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहणार आहे.
परिसंवाद, चर्चासत्र आणि बरंच काही..
या कृषी महोत्सवामध्ये परिसंवाद, चर्चासत्र, कृषी प्रदर्शन, खरेदीदार- विक्रेता संमेलन, शेतकरी सन्मान समारंभ, गृह उपयोगी वस्तूचे दालन, उत्पादक ते थेट ग्राहक विक्री दालन असे विविध स्टॉल व विविध कार्यक्रम असणार आहेत. जिल्हाभरातून तसेच जिल्हा बाहेरील शेतकरी या कृषी महोत्सवात सहभागी होणार आहेत.
उस्मानाबादला नाव मिळालं त्या धारासुर मर्दिनीचा इतिहास माहिती आहे का? पाहा Video
कृषी महोत्सवात विशेष काय?
कृषी महोत्सवात जिल्ह्यातील यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा पाहायला मिळणार आहेत. या शेतकऱ्यांनी शेतीत यश कसे मिळवले हेही त्यांच्या तोंडून आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आकर्षक पशुधनही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे.
Famous Gulab Jamun : उस्मानाबादचा फेमस गुलाबजाम खाल्ला आहे? पाहताक्षणीच पडाल प्रेमात Video
कृषी महोत्सवाचे ठिकाण
उस्मानाबाद बस स्थानकाच्या समोर असणाऱ्या श्री. तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथे हा कृषी महोत्सव होणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी या कृषी महोत्सवास उपस्थिती लावावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Osmanabad