20 फूट गोधडीमध्ये साकारले शिवाजी महाराज, पाहताक्षणीच कराल मुजरा

गोधडी ही आपली सांस्कृतिक ओळख आहे. 

याच गोधडी मध्ये दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल मध्ये मंथन आर्ट स्कूल आणि मदर क्विल्ट्सने मिळून 20 फूट लांबी रुंदीची छत्रपती शिवाजी महाराजांची कलाकृती साकारली आहे.

या कलाकृती मध्ये विवध कापडांच्या रंगीबेरंगी तुकड्यांचा वापर करण्यात आला आहे.

गोधडी ही आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. ज्याप्रमाणे गोधडी कापडाच्या वेगवेगळ्या तुकड्यांनी जोडली जाते. 

त्याला प्रेमाच्या धाग्याने विणली जाते. तश्याच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची निर्मिती केली. 

हीच संकल्पना घेऊन 20×20 फुटाची ही गोधडी साकारण्यात आली आहे. नऊ सांकेतिक चिन्ह, दोन ध्वज, संदेश असे या कलाकृती मध्ये पाहायला मिळतात.

गावागावातल्या महिलांना एकत्र करून ही गोधडी तयार करण्यात आली आहे.

आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भव्य दिव्य एक युग पुरुष माहिती आहेत. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली कार्य काय आहेत. 

 आजच्या घडीला या कार्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम घडतो. हे दर्शविणारे काही सांकेतिक चिन्ह या गोधडीमध्ये वापरलेले आहेत, असं मंथन आर्ट स्कूलचे शशिकांत गवळी यांनी सांगितले.