JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Jayant Patil : सुनिल तटकरेंना मिठी का मारली? चर्चा वाढल्यानंतर जयंत पाटलांनी सांगितलं खरं कारण

Jayant Patil : सुनिल तटकरेंना मिठी का मारली? चर्चा वाढल्यानंतर जयंत पाटलांनी सांगितलं खरं कारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज विधिमंडळामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना मिठी मारली.

जाहिरात

जयंत पाटील यांनी तटकरेंना मारली मिठी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विनोद राठोड, प्रतिनिधी मुंबई, 24 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज विधिमंडळामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना मिठी मारली. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे, त्यानंतरही या दोन नेत्यांमध्ये झालेली गळाभेट चर्चेचा विषय ठरत आहे. एवढच नाही तर वेगवेगळ्या राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे. यानंतर आता जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले जयंत पाटील? ‘सुनिल तटकरे वेगळ्या पक्षात आहेत आणि मी आता वेगळ्या पक्षात आहे. ऋणानुबंध असू शकतात, त्याचा राजकीय अर्थ काढू नये. सगळ्यांशी माझे चांगले संबंध आहेत. आम्ही एकमेकांना ओळखतो. मी शरद पवार यांच्यासोबत आहे, त्यामुळे वेगळा अर्थ काढू नये,’ असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

‘आम्ही तटकरेंसोबत तीस वर्ष काम केलं आहे. तिकडे खासगी स्वरुपाचा विनोद झाला. माझं बोलणं व्यक्तीगत स्वरूपात होतं. विधानसभा सभागृहात चोरून फोटो काढणारे आहेत. खासगी प्रसंगाची चर्चा झाली, त्यातून विनोद झाला. मन की बात आम्ही सोडून गेलेल्यासोबत करू शकत नाही. मी अजित पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांसोबत जेवण केलं. गळाभेट समोरून असते ती मागून होत नाही,’ असं जयंत पाटील म्हणाल आहेत. …अन् अजितदादा आपल्याच तीन आमदारांवर भडकले, मुख्यमंत्र्यांसमोरच झापलं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या