यवतमाळ, 21 ऑगस्ट : राज्यभरात राष्ट्रवादीला मोठी गळती लागली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते आणि खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर हे भाजपच्या तर कोकणातील नेते सुनील तटकरे हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. या सगळ्या चर्चांवर राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'अनेकजण चौकशीच्या ससेमिऱ्यापासून वाचण्यासाठी किंवा सरकारकडून काही फायदा मिळवण्यासाठी पक्ष सोडत आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी पक्ष सोडणाऱ्यांना रोखू शकत नाही,' असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.