JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबई लोकलच्या वादात रोहित पवारांची उडी, केंद्रीय रेल्वे मंत्र्यावर साधला निशाणा

मुंबई लोकलच्या वादात रोहित पवारांची उडी, केंद्रीय रेल्वे मंत्र्यावर साधला निशाणा

स्वार्थी राजकारणासाठी सतत जोमात असणारे विरोधक अशा सामाजिक प्रश्नावर मात्र कोमात जातात…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 नोव्हेंबर: कोरोनाबाधित (Coronavirus)रुग्ण वाढीचा दर घसल्यानंतर आता मुंबईत लोकल (Mumbai Local) सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, रेल्वे प्रशासन लोकल सुरू करण्यास जाणीवपूर्वक उशीर करत असल्याचा आरोप राज्य सरकारनं केला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी उडी घेतली आहे. आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील लोकल सुरू करण्याच्या मुद्द्यावरुन थेट केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल (Union Ministe Piyush Goal) यांच्यावर निशाणा साधला आहे. हेही वाचा… मराठी भाषिकांची मुस्कटदाबी सुरूच! राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांचा गनिमी कावा ‘श्रमिक रेल्वेबाबत राज्य सरकारने तपशील दिला नाही, असं tweet मध्यरात्री करण्याची तत्परता दाखवणारे रेल्वे मंत्री पियुष गोयल हे लोकल सुरु करण्याच्या पत्रावर चार दिवस उलटले तरी निर्णय घेत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. तर स्वार्थी राजकारणासाठी सतत जोमात असणारे विरोधक अशा सामाजिक प्रश्नावर मात्र कोमात जातात, अशी खोचक टीका भाजपवर केली आहे. एवढंच नाही तर रोहित पवार यांनी मुंबई लोकल सुरु करण्यासंदर्भात रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना श्रमिक रेल्वेबाबत त्यांनी केलेल्या ट्वीटची आठवण करुन दिली.

संबंधित बातम्या

सर्वसामान्यांसाठीही मुंबई लोकल सुरु करण्याबाबत चाचपणी करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहिले होते. दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या सात महिन्यांपासून ठप्प असलेली मुंबई लोकल सेवा सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने (maha vikas aghadi government) प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भात केंद्र सरकारला पत्रही पाठवण्यात आले आहे. पण, ‘रेल्वे विभाग या कामात खोडा घालत आहे’, असा गंभीर आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला आहे. मुंबईत कोरोनाचा लाट आता ओसरत चाललेली आहे. त्यामुळे मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात यावी अशी मागणी सर्वच स्तरातून होतं आहे. राज्य सरकारनेही नवरात्रीपासून महिलांसाठी लोकल सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आता सर्वांसाठीच लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे. हेही वाचा.. एकनाथ खडसेंच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी येणाऱ्या काळात खान्देशात मोठी मजल मारेन राज्य सरकारने मुंबईत लोकल सेवा सुरू करावी, याबद्दले रेल्वे विभागाला पत्र पाठवले आहे. पण, रेल्वे विभागाकडून लोकल सेवा सुरू करण्याच्या कामात खोडा घालत आहे. सर्व सामान्य मुंबईकरांना दिलासा देण्याची गरज आहे, पण यातही राजकारण केले जात आहे’, असा आरोपच गृहमंत्री देशमुख यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या