जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मराठी भाषिकांची मुस्कटदाबी सुरूच! राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर गनिमी काव्यानं पोहोचल्या

मराठी भाषिकांची मुस्कटदाबी सुरूच! राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर गनिमी काव्यानं पोहोचल्या

मराठी भाषिकांची मुस्कटदाबी सुरूच! राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर गनिमी काव्यानं पोहोचल्या

बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आज, 1 नोव्हेंबर हा काळा दिवस पाळला जात आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

कोल्हापूर, 1 नोव्हेंबर: बेळगावात (Karnataka Maharashtra border Belgaum) महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आज, 1 नोव्हेंबर हा ‘काळा दिवस’ (Black day)  पाळला जात आहे. भाषावर प्रांतरचनेच्या बेळगावसह सीमावर्ती मराठीबहुल भाग कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ हा दिवस पाळला जातो. बेळगावात मराठी भाषिकांच्या निषेध मेळाव्याला सुरुवात झाली आहे. कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या जात आहेत. मात्र, दुसरीकडे कर्नाटक पोलिसांकडून मराठी भाषिकांची मुस्कटदाबी सुरूच आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर अक्षरश: गनिमी काव्यानं मराठी भाषिकांच्या मेळाव्याला उपस्थित झाल्या आहेत. रूपाली चाकणकर यांना बेळगावात पोहोचण्यासाठी रिक्षानं प्रवास करावा लागला. हेही वाचा… मुंबईत लोकल सुरू करण्यावरून देशमुखांचा रेल्वे विभागावर गंभीर आरोप, म्हणाले… दुसरीकडे, कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा मराठा बांधवांच्या कार्यक्रमस्थळी गोंधळ घातला आहे.  मराठी भाषिकांच्या मेळाव्यात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या कन्नड कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी एक प्रतिनिधी या सभेला येत असतो. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या वतीने मंगेश चिवटे देखील मेळाव्याला उपस्थित झाले आहेत. कोरोना महामारीमुळे यंदाची मराठी भाषिकांच्या निषेध सायकल फेरी आणि जाहीर सभा रद्द करण्यात आली. त्याऐवजी मराठा मंदिर येथे धरणे आंदोलन प्रशासनाने परवानगी दिली. पण ही परवानगी देत असताना लोकांनी आंदोलन स्थळांपर्यंत पोहोचू नये, यासाठी पोलिसांकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. एकावेळी केवळ 50 लोक आंदोलनात सहभागी होणार आहेत. टप्प्याने आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या मराठी भाषिकांची कोंडी केली जात आहे. हेही वाचा.. एकनाथ खडसेंच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी येणाऱ्या काळात खान्देशात मोठी मजल मारेन रविवारी सकाळपासूनच शहरातील विविध मार्गांवर कर्नाटक पोलिसांनी नाकाबंदी करण्यात आली आहे. मराठा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतुकीला बंदी घातली आहे. लोकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. काळे कपडे घातलेल्या लोकांना जाब विचारण्यात येत आहे. पोलिसांच्या या मुस्कटदाबीचा तीव्र संताप व्यक्त होत असून हे धरणे आंदोलन दुपारी दोन वाजेपर्यंत चालणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात