जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / एकनाथ खडसेंच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी खान्देशात मोठी मजल मारेन, अनिल देशमुखांचा दावा

एकनाथ खडसेंच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी खान्देशात मोठी मजल मारेन, अनिल देशमुखांचा दावा

एकनाथ खडसेंच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी खान्देशात मोठी मजल मारेन, अनिल देशमुखांचा दावा

राज्यातील महाआघाडी सरकार नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पडणार, या फक्त वावड्या…

  • -MIN READ
  • Last Updated :

निलेश पवार, (प्रतिनिधी)- नंदुरबार, 1 नोव्हेंबर: भाजपला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसे यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस येणाऱ्या काळात खान्देशात (Khandesh North Maharashtra) मोठी मजल मारेन, असा दावा राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात एका मंदिराचे पूजनाच्या कार्यक्रमानिमित्त रविवारी अनिल देशमुख हे शहादा येथे आले आहेत. हेही वाचा… ..आणि भरसभेत भाजप नेते ज्योतिरादित्य म्हणाले, ‘पंजासमोरील बटन…’, Video व्हायर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना अनिल देशमुख म्हणाले, राज्यातील महाआघाडी सरकार नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पडणार, या फक्त वावड्या आहेत. महाविकास आघाडी सरकार अधिक मजबूत आणि स्थिर आहे. सरकार 5 वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेन, असं सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच गट-तट बाजूला ठेवून पक्ष वाढीच्या कामाला लागण्याचे आदेश देखील अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. मंदिराच्या भूमिपूजनासाठी ठाकरे-पवारांची परवानगी घेतली का? गृहमंत्री  अनिल देशमुख आज नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात एका मंदिराचे पूजन करणार आहेत. खेतिया रस्त्यावर मोहिदेतर्फे हवेली शिवारात विष्णूपुरम तीर्थाच्या पाया भरणीनिमित्त अधिष्ठान महापूजा आयोजित करण्यात आली आहे. हा सोहळा अनिल देशमुखांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमावरुनच भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. अनिल देशमुख यांनी मंदिराचं भूमिपजन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची परवानगी घेतली का? असा खोचक सवाल भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी केला आहे. हेही वाचा… जयंत पाटलांनी हाताला काळ्या फिती लावून केला कर्नाटक सरकारचा निषेध, म्हणाले… काय म्हणाले आचार्य तुषार..? ‘गृहमंत्री अनिल देशमुख एका मंदिराचे भूमिपूजन करणार आहे. ही बाब अभिनंदनीय आणि स्वागतार्हच आहे. पण आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची परवानगी घेतली का?” असा प्रश्न आचार्य तुषार भोसले यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात