JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अजितदादांचं गणित बरोबर, काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

अजितदादांचं गणित बरोबर, काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

जरी 16 आमदार अपात्र झाले तरी सरकार स्थिर असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं होतं. आता अजित पवार यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

जाहिरात

अजित पवार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 16 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अजित पवार हे महाविकास आघाडीवर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र आता अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. जरी 16 आमदार अपात्र झाले तरी देखील सरकार स्थिर राहील असा अप्रत्यक्ष दावाच त्यांनी केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी 16 आमदार अपात्र जरी झाले तरी सत्ताधारी पक्षाकडे कसं बहुमत राहिल याचं गणितच मांडलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया आता यावर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांचं गणित बरोबर आहे, विरोधकांकडे पुरेसं संख्याबळ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एवढंच नव्हे तर सरकार कोसळलं तरी त्यांचाच मुख्यमंत्री होईल असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार  अजित पवार यांनी म्हटलं की, अपक्ष धरून भाजपकडे 115 आमदार आहेत. 106 त्यांचे आणि नऊ अपक्ष. एकनाथ शिंदेसोबत गेलेले 40 आमदार, 10 अपक्ष आमदार थोड्यावेळ बाजूला ठेवले तरी दोघं मिळून 155 आणि 10 अपक्ष असे 165 आमदार सध्या सरकारकडे आहेत. त्यामुळे जरी 16 आमदार अपात्र झाले तरी देखील सरकारकडे बहुमताचा आकाड कायम राहणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या