JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Political news : आता काँग्रेसकडूनही मुख्यमंत्रिपदावर दावा? 'या' नेत्याच्या नावाचे लागले पोस्टर

Political news : आता काँग्रेसकडूनही मुख्यमंत्रिपदावर दावा? 'या' नेत्याच्या नावाचे लागले पोस्टर

काँग्रेसकडून लावण्यात आलेल्या ‘या’ पोस्टरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

जाहिरात

काँग्रेसकडूनही मुख्यमंत्रिपदावर दावा?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 4 जून :  नागपूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शहरात जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरवर नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. नागपुरच्या अजनी भागात असे पोस्टर लावण्यात आले आहेत. दरम्यान यापूर्वी आदित्य ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्याचे देखील भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले पोस्टर ठाकरे गट शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून नागपुरात लावण्यात आले होते. या पोस्टरवरून शिंदे गटानं आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. पोस्टरवर भावी मुख्यमंत्री असा मजकूर  पाच जूनला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात कार्यकर्त्यांकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. नाना पटोले यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. ज्या पोस्टरवर माननीय आमदार नाना पटोले भावी मुख्यमंत्री, शेतकरी पुत्र, कामकरी लोकांचे कैवारी असा उल्लेख करण्यात आला आहे. हे पोस्टर राज्यात चर्चेला विषय ठरले आहेत. राऊतांचा दौरा अन् अख्खी नगरपंचायत शिंदे गटात; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं? आदित्य ठाकरेंचे पोस्टर  दरम्यान दुसरीकडे नागपुरात काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले होते. ते नागपूर दौऱ्यावर असताना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आदित्य ठाकरे यांचे पोस्ट लावण्यात आले होते. आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख त्या पोस्टरवर करण्यात आला होता. या पोस्टरवरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जोरदार निशाणा साधला होता. असे पोस्टर लावून कोणी मुख्यमंत्री होत असेल तर मी माझे शहरभर पोस्टर लावले असते असं शिरसाट यांनी म्हटलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या