विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 11 फेब्रुवारी : सकाळच्या नाष्ट्यापासून ते अगदी लग्नाची सोयरीक जुळवण्यापर्यंत खाल्ले जाणारे पोहे तसे सर्वांच्याच परिचयाचे आहेत. मात्र याच पोह्यांना तर्री पोह्याच्या रूपाने खरा लौकिक नागपूरकरांनी मिळवून दिला. झणझणीत सावजी तर्री पोहे असो की, अलीकडे नव्याने नावारुपास आलेले ऑरगॅनिक पोहे, नागपूरकर त्यावर आवडीने ताव मारतात. पोह्यांच्या याच लोकप्रियतेने नागपूरच्या उच्चशिक्षित तरुणांना भूरळ घातली आणि नोकरीच्या चाकोरीबद्ध आयुष्यात न गुंतता त्यांनी पोह्यांच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे सध्या ते पोहे विक्रीतून लाखोंची उलाढाल करीत आहेत.
आयटीत काम करताना सुचली कल्पना नागपूरमधील पोहेवाला हा ब्रँड म्हणजे दोन उच्चशिक्षित मित्रांना व्यवसायिक प्रवास आहे. चाहूल बालपांडे एमबीए झालेला तर पवन वाडीभस्मे याने इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं होतं. दोघेजण एका आयटी प्रोजेक्टवर काम करत होते. तेव्हा त्याचे पैसे उशिराने मिळणार होते. दरम्यानच्या काळात काय करता येईल याचा विचार करत असताना त्यांना फूड इंडस्ट्रीमध्ये उतरण्याची कल्पना सुचली. नागपूरच्या खाद्य संस्कृतीत लोकांचा सर्वात आवडता मेनू पोहे आहे. त्यामुळे पोह्याचाच व्यवसाय करण्याचा निर्धार दोघांनी केला.
IAS Arpit Gupta : अनेकांनी मारले टोमणे, भावालाही गमावलं पण तो खचला नाही, शेवटी करुन दाखवलं!रात्री पोहे विकायला केली सुरुवात
पोहे तसे सर्वांच्याच घरी बनत असतात त्यात नवल काय? असा प्रश्न आपल्याप्रमाणेच त्यांनाही पडला. मात्र उत्तम ब्रँडिंग, मार्केटिंग आणि गुणवत्तेसह नाविन्यतेच्या जोरावर व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. 2018 च्या मे महिन्यात सुरवातीला ऑफ टाईम मध्ये पोहे विकले. रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत पोहे विकण्याला सुरवात केली. त्यासाठी वेबसाईट तयार केली. त्यातून ऑनलाइन आणि ऑफलाईन पोहे विक्रीला सुरवात केली. आम्ही योग्य नियोजन करून सुरुवात केली त्यामुळे बघता बघता आमच्या या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद आणि प्रेम मिळाले, असे चाहूल यांनी सांगितले.
Sangli : नगरसेवकच झाले शिक्षक; पहिलाच तास थेट नदीवर, Videoपोहेवाला ब्रँड झाला
आम्ही केवळ पोहे विकले नाहीत तर लोकांच्या आवडी निवडी जपल्या. त्यात संशोधन करत वेगवेगळ्या प्रकारचे पोहे बनवले. लोकांना ऑरगॅनिक पोहे उपलब्ध करून दिले. त्यात आरोग्यास उपयुक्त द्रव्य, प्रोटीन्स, आयर्नचा समावेश आहे. यासह पनीर पोहा, इंदोरी पोहा, नागपूर स्पेशल तर्री पोहे, चिवडा पोहा, मिसळ पोहा,इत्यादी अश्या एकूण 13 प्रकारचे पोहे एका छताखाली दिले. त्यामुळे एका कढई पासून सुरू झालेला हा प्रवास आज नागपूरहून महाराष्ट्रात आणि परराज्यातही पोहोचला. मध्यप्रदेश, छतीसगड सारख्या प्रदेशातही महाराष्ट्रातीय पोह्यांना लोकांची पसंती मिळत आहे, अशी माहिती चाहूल यांनी दिली.
Video: ‘एकलव्य’ घडविणाऱ्या शेतकरी पुत्राचा ब्रिटनमध्ये सन्मान, फोर्ब्स’नेही घेतली दखलनवउद्योजकांसाठी आदर्श
पोहेवालाचे आज 13 हून अधिक आउटलेट आहेत. यातून 100 हून अधिक लोकांना थेट रोजगार दिला जातो. एका आउटलेट वरून महिन्याला 4-5 लाखांचे उत्पन्न मिळते. तर सर्व आउटलेट वरून महिन्याला 50-60 लाखांची उलाढाल होते, अशी माहिती चाहूल बालपांडे यांनी दिली. तसेच आज मी स्वतः एमबीए चे शिक्षण घेतले आहे आणि माझा सहकारी इंजिनियर आहे. शिक्षण हे प्रत्येकाने घेतलेच पाहिजे. मात्र या शिक्षणाच्या जोरावर आपण उत्तम व्यवसाय देखील करू शकतो. कुठलाही व्यवसाय लहान मोठा नसतो, तर नाविन्यता, उत्तम गुणवत्ता, मार्केटिंग इत्यादींचे सूत्र आपल्याला यशस्वी उद्योजक करत असते, असे चाहूल सांगतात. त्यामुळे उच्चशिक्षित तरुणांनी सुरू केलेला ‘पोहेवाला’ हा ब्रँड नव उद्योजक तरुणांसाठी आदर्श आहे.

गुगल मॅपवरून साभार