स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 10 फेब्रुवारी: गेल्या काही काळापासून राज्यात शिक्षक भरती न झाल्याने अनेक शाळांमध्ये शिक्षकाच्या जागा रिक्त आहेत. सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या शाळांतही काहीशी अशीच स्थिती आहे. त्यामुळे मिरजेतील नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी थेट विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विनामोबदला शिकवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीने त्यांना रितसर परवानगीही दिली आहे. एका लोकप्रतिनिधीने शाळेत जावून शिकवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या निर्णयाचे कौतुक होत आहे.
महापालिका शाळेच्या सुधारणेसाठी प्रयत्न मिरजमधील प्रभाग क्र. 20 मध्ये सांगली महानगरपालिकेच्या शाळा आहेत. या 6 शाळांना नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी भौतिक सुविधा दिल्या. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की 13 नं आणि 25 नं शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक कमी आहेत. शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांना अध्यापन करणे गैरसोयीचे झाले होते. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी गैरसोय होऊ नये आणि शिक्षणाबद्दलचे प्रेम कमी होऊ नये यासाठी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी स्वतः प्रशासन अधिकारी आणि महापालिकेचे आयुक्त यांना मी विनामोबदला विद्यार्थ्यांना अध्यापन करतो तशी मला रितसर परवानगी मिळावी, असा पत्रव्यवहार केला.
Inspiring Teacher: विद्यार्थ्यांसाठी सुरू केला ‘ऑनलाईन कट्टा’, सांगलीच्या शिक्षकाची राज्यभर चर्चा, Videoविनामोबदला अध्यापनाची परवानगी
नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केलेल्या विनंतीनुसार शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव मंजूर झाला. नगरसेवक थोरात यांना विनामोबदला अध्यापन करण्यासाठी शिक्षक म्हणून रितसर परवानगी देण्यात आली. ऑर्डर काढून त्यांना सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका शाळा नं 13 मध्ये 8 वीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याची परवानगी दिली.
ग्रामीण भागातील प्रयोगशील शाळा, शालाबाह्य विद्यार्थ्यांनाही लागली गोडी, Videoपहिलाच तास थेट नदीवर
नगरसेवक थोरात यांनी शाळेतील आपल्या अध्यापनाचा पहिला तास 8 वीच्या वर्गावर घेतला. नदी प्रदुषण कसे होते? हे शिकवण्यासाठी ते विद्यार्थ्यांना थेट नदीवर घेऊन गेले. तिथेच त्यांनी विद्यार्थ्यांना नदी प्रदुषण आणि प्रदुषण रोखण्याबाबत धडे दिले. प्रत्यक्ष ठिकाणावर जावून शिक्षण देण्याच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता.
शेतकऱ्याचा नादखुळा! वीज तोडायला आलेल्या महावितरण अधिकाऱ्याला इंग्रजीतून विचारला जाब, Video Viralयोगेंद्र थोरात यांचे ‘एमबीए’ पर्यंत शिक्षण
नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. एम.बी.ए. झालेला नगरसेवक शिक्षक म्हणून काम करत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. शाळेमध्ये शिक्षक कमी असल्याने महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच नगरसेवकाने शिक्षक पदाची जबाबदारी घेऊन अध्यापन केले. “महापालिका शाळांमध्ये चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळू लागले तर शाळेचा पट व पत नक्कीच वाढेल. त्यासाठी मी शक्य ते योगदान देणार आहे,” असे थोरात म्हणाले.