मराठी बातम्या /बातम्या /करिअर /IAS Arpit Gupta : अनेकांनी मारले टोमणे, भावालाही गमावलं पण तो खचला नाही, शेवटी करुन दाखवलं!

IAS Arpit Gupta : अनेकांनी मारले टोमणे, भावालाही गमावलं पण तो खचला नाही, शेवटी करुन दाखवलं!

IAS अर्पित गुप्ता

IAS अर्पित गुप्ता

अनेकदा प्रचंड मेहनत करूनही प्रत्येकाला यूपीएससी परीक्षेत यश मिळणं शक्य होत नाही. पण काही जण शेवटपर्यंत हार मानत नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : दरवर्षी लाखो उमेदवार आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. यासाठी ते त्यांच्या सर्व छंदांना आणि सोशल मीडियापासूनही दूर होता. मात्र, अनेकदा इतकं करूनही प्रत्येकाला यूपीएससी परीक्षेत यश मिळणं शक्य होत नाही. यूपीएससी नोकरी मिळवण्याचा हा प्रवास खूप कठीण मानला जातो. गोरखपूरच्या अर्पित गुप्ता यांनाही आयएएस अधिकारी होण्याच्या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आज त्यांच्या संघर्षमय आणि तितकाच प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊयात.

IAS अर्पित गुप्ता हे उत्तर प्रदेशातील गोरखपूरचे रहिवासी आहेत. वयाच्या 24 व्या वर्षी त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. हा प्रवास त्यांच्यासाठी खूप खडतर होता. देशातील सर्वात खडतर स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याच्या या प्रवासात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या काळात टोमणे मारण्यापासून ते प्रिय व्यक्ती गमावल्याच्या दु:ख त्यांना सोसावं लागलं. पण तरी त्यांनी स्वत: कमकुवत होऊ दिले नाही.

IAS अर्पित गुप्ता यांनी GN नॅशनल पब्लिक स्कूल, गोरखपूर येथून हायस्कूल आणि इंटरमिजिएट बोर्ड परीक्षा पूर्ण केली आहे. त्यानंतर त्यांनी आयआयटी रुरकी येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. पदवीनंतर लगेचच त्यांनी आर्थिक बाजार विश्लेषक म्हणून करिअरला सुरुवात केली. मात्र, 3 महिन्यांनीच नोकरी सोडल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

हेही वाचा - Success Story : IAS साठी IPS ची ट्रेनिंग मधेच सोडली, शेवटी मिळवलंच! कार्तिक जीवाणींचा संघर्ष फळाला

अर्पित गुप्ता यूपीएससी परीक्षेच्या दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाले होते. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात त्यांना यूपीएससी मेन्सच्या आधी कांजण्या झाल्या. त्यानंतर फक्त एका गुणाने त्यांची संधी हुकली. यामुळे ते खूप निराश झाले होते. त्यांना लोकांचे टोमणेही ऐकावे लागले. पण तरीही त्यांनी हार मानली नाही आणि पुढच्या प्रयत्नाची तयारी ते करत राहिले. दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी चुलत भाऊ गमावला होता. पण तरीही त्यांनी हार मानली नाही आणि 2021 च्या यूपीएससी परीक्षेत ते 54 वा क्रमांक मिळवून आयएएस अधिकारी बनले.

IAS अर्पित गुप्ता यांनी UPSC परीक्षेची मार्कशीट सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यांनी गणित हा ऐच्छिक विषय ठेवला होता. तसेच अर्पित यांनी लेखी परीक्षेत एकूण 805 गुण आणि व्यक्तिमत्व चाचणी म्हणजेच IAS च्या मुलाखतीत 193 गुण मिळवले होते. त्यांना एकूण 998 गुण मिळाले. त्यांचा प्रवास हा यूपीएससी उमेदवारांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

First published:

Tags: Career, Ias officer, Success story, Upsc