JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'त्या' घटनेमुळे नवनीत राणा भर कार्यक्रमात रडल्या, मागे बसलेल्या रवी राणा यांनीही हाताने खुणावलं, VIDEO

'त्या' घटनेमुळे नवनीत राणा भर कार्यक्रमात रडल्या, मागे बसलेल्या रवी राणा यांनीही हाताने खुणावलं, VIDEO

तेव्हा आम्हाला 14 दिवस तुरुंगात डांबण्यात आलं. पोलीस स्टेशनमध्ये बारा तास उभ ठेवलं, तुरुंगात पाणी सुद्धा दिलं नाही

जाहिरात

आम्हाला दोघांना जेलमध्ये टाकलं होतं, जेव्हा रवी राणा हे भेटायला आले,

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 06 एप्रिल : आम्हाला एक महिना भर जेलमध्ये ठेवणार होते, माझी लहान मुलं सुद्धा मला विचारत होती, तुम्हाला कशाला जेलमध्ये ठेवलं, असं म्हणत खासदार नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. यावेळी व्यासपीठावर आमदार नवनीत राणा हे सुद्धा भावुक झाले. आज हनुमान जयंतीच्या आणि नवनीत राणा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमरावती शहरात 111 फुटाची भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प राणा दाम्पत्यानी केला होता. त्या निमित्ताने आज हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

संबंधित बातम्या

‘उद्धव ठाकरे स्व:ताचा पक्ष सांभाळू शकले नाहीत, पक्षाची विचारधारा सांभाळू शकले नाहीत, आज बाळासाहेब ठाकरे देखील आश्रू ढाळत असतील असा जोरदार टोला नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

आम्हाला दोघांना जेलमध्ये टाकलं होतं, जेव्हा रवी राणा हे भेटायला आले, तेव्हा मी रडली तेव्हा माझ्यावर बोट उचलले. माझा MRI झाला तेव्हा माझ्यावर बोट उचलले, मी एक गोष्ट सांगते. राम भगवंताने अच्छे अच्छे का घमण्ड मीट्टी में मिला दिया उद्धव ठाकरे तुम किस खेत की मुली हो’ असे वक्तव्य नवणीत राणा यांनी केलं. (कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची वेळ, न्यायालयाने दिले आदेश) जिथे जिथे मविआची सभा होईल, तिथे-तिथे हनुमान चालीसाचं पठण करणार असल्याचा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. माझी काय चूक होती? राज्यावरचं संकट दूर व्हावं म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठण करावं एवढीच विनंती मी केली होती. मात्र तेव्हा आम्हाला 14 दिवस तुरुंगात डांबण्यात आलं. पोलीस स्टेशनमध्ये बारा तास उभ ठेवलं, तुरुंगात पाणी सुद्धा दिलं नाही, मुलं विचारायचे आई तु काय गुन्हा केलास? असं राणा यांनी म्हटलं आहे. (महाडिक आणि बंटी पाटील गटामध्ये राजारामच्या प्रचारात राडा, एकमेकांवर केले गंभीर आरोप) दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. विचार काय असतात आणि त्यासाठी कसे लढावे हे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांचे विचार धुळीस मिसळवले. ते पक्षाची विचारधारा सांभाळू शकले नाहीत. ते पक्ष सांभाळू शकले नाहीत अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे. तसेच जिथे-जिथे मविआची सभा होणार तिथे-तिथे हनुमान चालीसेचं पठण करणार असल्याचा इशाराही यावेळी नवनीत राणा यांनी दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या