जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची वेळ, न्यायालयाने दिले आदेश

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची वेळ, न्यायालयाने दिले आदेश

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची वेळ, न्यायालयाने दिले आदेश

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची प्रक्रिया राबवण्यासाठी अधिकारी आणि वकील दाखल आहेत. न्यायालयाने जिल्हाधिकारी कार्यालयातील खुर्च्या, लॅपट़ॉप, गाडी जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 05 एप्रिल : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची वेळ आली आहे. कुरुंदवाडमधील जमिनी वादाच्या प्रकरणाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं गेल्यानं न्यायालयाने हे आदेश देण्यात आले आहेत. १९८४ पासून हा खटला चालू होता. आता न्यायालयाने नुकसान भरपाईपोटी जिल्हाधिकारी कार्यालयावरच जप्तीचे आदेश काढले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी, की, कुरुंदवाड मधील विकास आराखड्यासाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठीचा वाद सुरू होता. यामध्ये कुरुंदवाड मधील वसंत संकपाळ यांची रस्त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जमीन घेतली होती.  जमिनीच्या बदल्यात कुठलाही मोबदला न दिल्याने 1984 पासून खटला चालू होता.

News18लोकमत
News18लोकमत

तुझं पॉलिटिकल करिअर बरबाद करू, पुण्यात काँग्रेस नेत्याला धमकीचा फोन   प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याने न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीचे आदेश काढले आहेत. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची प्रक्रिया राबवण्यासाठी अधिकारी आणि वकील दाखल आहेत. न्यायालयाने जिल्हाधिकारी कार्यालयातील खुर्च्या, लॅपट़ॉप, गाडी जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: court , kolhapur
  • First Published :
जाहिरात
जाहिरात