ज्ञानेश्वर साळोखे (कोल्हापूर), 06 एप्रिल : कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाचा मानला जाणाऱ्या राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत मोठी रंगत आली आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरा झडत असताना अचानक एक खळबळजनक घटना घडली आहे. दरम्यान राजाराम सहकारी कारखान्याचा प्रचार आता खालच्या पातळीवर घसरला असून एकमेकांवर चोरीचे आरोपही केले जात आहेत. महाडिक आणि सतेज पाटील गटात होणाऱ्या या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून सोशल वॉर ही रंगले आहे.
राजाराम कारखान्याची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप प्रत्यारोपांमुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. महाडिक आणि सतेज पाटील या पारंपरिक विरोधकात काट्याची टक्कर या निवडणुकीत पाहायला मिळत असून पायाला भिंगरी लावून दोन्ही नेते प्रचाराचे रान उठवत आहेत. त्यामुळे राजकीय संघर्ष टोकाला पोहचला आहे.
आप्पा विरुद्ध बंटी… कोल्हापुरात पुन्हा राजकीय राडा, कुणाचा कंडका पडणार? पाहा Videoयातून एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे.आता तर सतेज पाटील गटावर चोरीच्या प्रयत्नाचा आरोप केला जात आहे. सतेज पाटील गटाचे 29 उमेदवार अपात्र झाल्याने कारखान्याची कागदपत्रे चोरीचा प्रयत्न झाल्याचा आरोप सत्ताधारी गटाने केला आहे. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे.
सतेज पाटील गटाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने हे आरोप केले जात असल्याचा पलटवार सतेज पाटील गटाने केला आहे. तर कारखान्यात विरोधी सभासदांची बनावट कागदपत्रे तयार केली जात असल्याचा संशय आल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी कारखान्यावर गेल्याच खुलासाही करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची वेळ, न्यायालयाने दिले आदेशराजाराम कारखान्यात सत्ताधाऱ्यांचा कंडका पडायचाच असा इरादा घेऊन सतेज पाटील मैदानात उतरले आहेत. त्यातून दोन्ही गटात सोशल वॉर सुद्धा सुरू आहेत. त्यात आता चोरीच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कंडका नेमका कशाचा पडणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.