कालीचरण महाराज अन् बागेश्वर धाम बाबाची वादग्रस्त वक्तव्यं
बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी शिर्डीच्या साईबाबांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, साईबाबा हे देव नाहीत. साईबाबा संत आणि फकीर असू शकतात, पण देव होऊ शकत नाहीत.
कोणीही कोल्ह्याची कातडी धारण करून सिंह होऊ शकत नाही. एक कोल्हा हा कोल्हाच राहील.
शंकराचार्यांनी साईबाबांना कधीच देवतेचा दर्जा दिला नव्हता. शंकराचार्य हे हिंदू धर्माचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे प्रत्येक सनातनीने त्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
बागेश्वर धाम यांच्यासोबतच कालीचरण महाराज यांनीदेखील अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.
धर्मासाठी खून करणे गैर नाही, असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले होते.
यासोबत त्यांनी नुकतेच महात्मा गांधींविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले.
जितकं तुम्ही नथुराम गोडसे यांच्याबद्दल वाचणार तेवढे तुम्ही त्यांचे भक्त व्हाल.
नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींच्या बाबत केले ते बिल्कुल योग्य केले. नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता, असं वादग्रस्त विधान कालीचरण महाराज यांनी केलं
याआधीही त्यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत अपमानजनक शब्द वापरले होते.