JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Cabinet meeting : मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला सावरकरांचं नाव

Cabinet meeting : मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला सावरकरांचं नाव

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

जाहिरात

मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 जून : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यामध्ये वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव देण्यात आलं आहे. तर एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असं नाव देण्यात आलं आहे. तसेच दारीद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याचा लाभ राज्यातील सुमारे बारा लाख विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आजच्या बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव देण्यात आलं आहे. तर एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असं नाव देण्यात आलं आहे. दारीद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे. संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील लाभधारकांच्या निवृत्तीवेतनात भरीव वाढ करण्यात आली आहे. असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळाती स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ज्याचा कोट्यवधी कामगारांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. मोर्चापूर्वीच भाजपनं ठाकरे गटाला घेरलं; ‘त्या’ बॅनरची जोरदार चर्चा नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात विदर्भाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारण्यासाठी 100 कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या