JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Politics : सत्ताधारी-विरोधकांच्या फोडाफोडीत ठाकरेंकडून मित्राचाच गेम? काँग्रेस आमदार मातोश्रीवर!

Maharashtra Politics : सत्ताधारी-विरोधकांच्या फोडाफोडीत ठाकरेंकडून मित्राचाच गेम? काँग्रेस आमदार मातोश्रीवर!

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमदारांच्या फोडाफोडीमुळे राजकीय भूकंप झाला आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे त्यांचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसलाच धक्का द्यायच्या तयारीत आहेत.

जाहिरात

काँग्रेस आमदार ठाकरे गटात प्रवेश करणार?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमदारांच्या फोडाफोडीमुळे राजकीय भूकंप झाला आहे. आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे त्यांचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसलाच धक्का द्यायच्या तयारीत आहेत. काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. प्रतिभा धानोरकर या वरोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यामुळे या मतदारसंघात आता पोटनिवडणूक होणार आहे. या लोकसभा पोटनिवडणुकीत प्रतिभा बाळू धानोरकर ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहीती मिळतेय. यासाठी त्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसला सोडण्यासही तयार असल्याची माहीती राजकीय सूत्रांनी दिली आहे.

स्वार्थी लोकं गेले तरी.., निलम गोऱ्हेंच्या शिवसेना प्रवेशावर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया दिवंगत खासदार बाळू धानोरकर आणि त्यांचे कुटुंबिय हे 2019 च्या आधी शिवसेनेत होते. त्यामुळे धानोरकर कुटुंब आता पुन्हा शिवसेनेत पक्ष प्रवेश करत असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. 2019 लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी बाळू धानोरकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. बाळू धानोरकर हे महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक जिंकलेले काँग्रेसचे एकमेव खासदार होते. …म्हणून उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला, नीलम गोऱ्हे यांचं स्पष्टीकरण

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या