जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Neelam Gorhe : स्वार्थी लोकं गेले तरी.., निलम गोऱ्हेंच्या शिवसेना प्रवेशावर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

Neelam Gorhe : स्वार्थी लोकं गेले तरी.., निलम गोऱ्हेंच्या शिवसेना प्रवेशावर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

गोऱ्हेंच्या पक्षप्रवेशावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया

गोऱ्हेंच्या पक्षप्रवेशावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया

आज विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी शिवसेनेते प्रवेश केला आहे. त्यावर आता ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

 मुंबई, 7 जुलै : शिवसेना ठाकरे गटाला गळती सुरूच आहे. आज विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी शिवसेनेते प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यांवर निशाणा साधला आहे. दरम्यान निलम गोऱ्हे यांच्या पक्षप्रेवेशावर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी निलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. निलम ताईंना 4 वेळा  विधान परिषदेची उमेदवारी दिली. उपसभापतीपद दिलं. त्यांनी चार टर्म आमदारकी उपभोगली. मी याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. आज शिवसैनिकांना किती यातना होत असतील. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत लाखो जण उभे आहेत. स्वार्थी लोक  गेले तर फरक पडत नाही. पक्षाला दगा देणं किंवा वार करणं त्यांना शोभत नाही. त्यांना मिळालेली आश्वासने पूर्ण व्हावीत, असं परब यांनी म्हटलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

निलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलतना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, निलम गोऱ्हे  यांचा शिवसेनेतील प्रवेश हा ऐतिहासिक आहे. आता निलम गोऱ्हे यांना मनासारंख काम करता येईल, अन्यायाविरोधात वाचा फोडता येतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात