JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ajit Pawar : मोठी बातमी! अखेर नरहरी झिरवाळांचा अजित पवारांना पाठिंबा

Ajit Pawar : मोठी बातमी! अखेर नरहरी झिरवाळांचा अजित पवारांना पाठिंबा

मोठी बातमी समोर येत आहे. अखेर राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे.

जाहिरात

नरहरी झिरवाळांचा अजित पवारांना पाठिंबा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 जुलै :  मोठी बातमी समोर येत आहे. अखेर राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. नरहरी झिरवाळ हे अजित पवार गटात सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. काही आमदारांनी अजित पवार  यांना पाठिंबा दिला आहे, तर काही आमदार हे शरद पवार गटामध्ये आहेत. दरम्यान नेमका पाठिंबा द्यायचा कोणाला याबाबत राष्ट्रवादीच्या काही आमदारांमध्ये अजूनही संभ्रम कायम असल्याचं दिसून येत आहे. नरहरी झिरवाळ यांनी आतापर्यंत आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र आता ते अजित पवारांच्या गटात सामील झाले आहेत.    दिग्गज नेत्यांची उपस्थिती  अजित पवार यांनी पक्षातून बंड केल्यानंतर नरहरी झिरवाळ कोणाला पाठिंबा देणार याकडे लक्ष लागलं होतं. नरहरी झिरवाळ यांनी पाठिंब्याबाबतची आपली भूमिका जाहीर केली नव्हती मात्र आज त्यांनी अजित पवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यांचं स्वागत देखील करण्यात आलं. यावेळी अजित पवार यांच्यासह धनंजय मुंडे, सुनिल तटकरे यांची देखील उपस्थिती होती. किरण लहामटेंनी घेतली अजित पवारांची भेट?  अकोल्याचे आमदार किरण लहामटे यांनी काल मध्यरात्री मुंबईत अजित पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये रात्री उशिरा बैठक झाली आहे. यापूर्वी लहामटे यांनी शरद पवार यांच्या बैठकीला हजेरी लावली होती. मात्र काल त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे किरण लहामटे देखील अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या