कोल्हापूर, 03 मार्च : मागच्या दोन दिवसांपासून खासदार संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान संजय राऊत यांनी कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर विधानसभेवरून केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील वातावरण जोरदार तापले होते. दरम्यान त्यांनी मागच्या दोन दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख शहरात सभा घेतल्या यामध्ये त्यांनी ठाकरे गटातून फुटलेल्या दोन खासदार आणि आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. दरम्यान राऊत यांनी धैर्यशील माने यांच्यावर जोरदार टीका केली. गद्दार खासदार म्हणत त्यांनी इचलकरंजी येथे माने यांना थेट आव्हान दिले.
यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले की, धैर्यशील मानेंनी ‘मीच खासदार’ टॅगलाईन बदलून आता ‘मीच गद्दार’ करावी, “यांचे नाव धैर्यशील कोण ठेवले? यांना कोठेच धैर्य नसतो. कदाचित त्यांना भाजपही तिकीट देणार नाही. खोकेपटूंमधील हाही मोठा खेळाडू आहे असे खात्रीलायकरित्या समजले आहे.
संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची चौकशी करा, मनसे नेत्याची खळबजनक मागणीजनभावना बघता त्यांना बाहेरही फिरता येणार नाही, अशा गद्दारांना तुम्हीच योग्य तो धडा शिकवा. इचलकरंजीमधील घोरपडे नाट्यगृहात शिवगर्जना मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारचाही संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला.
ते पुढे म्हणाले की, मूळ शिवसेना ही जनमाणसांची आहे. बाहेर गेलेले 40 गद्दार महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. त्यांच्या पुढील पिढ्यांनाही गद्दार म्हणून कायम कपाळावर कलंक राहणार आहे. जनताच त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राइक करेल. धैर्यशील माने यांनी ‘मीच खासदार’ ही टॅगलाईन बदलून आता ‘मीच गद्दार’ अशी ठेवावी लागेल, आता तुम्हीच त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. दरम्यान 2019 च्यावेळी 15 दिवसांत जनतेने मीच खासदार म्हणत मानेंना निवडून दिले परंतु या मानेंना आता मीच गद्दार म्हणून त्यांची जागा दाखवून द्या असेही राऊत म्हणाले.
शिवसेना संपवण्यासाठी यापूर्वी अनेक प्रयत्न झाले, पण कोणालाही ते जमले नाही. तर या रंगा बिल्लाला काय जमेल? त्यांनी शंभरवेळा पुनर्जन्म घेतला तरी ते शक्य नाही. शिवसेना ही एक ठिणगी आहे, बाळासाहेबांना अपेक्षित शिवसेना टिकून ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी खंबीरपणे लढा द्यावा. 2024 च्या निवडणुकीनंतर यांना जनभावना कळेल मुख्यमंत्री व पंतप्रधान कोण असेल हेही कळेल.” यावेळी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, माजी आमदार सुजित मिणचेकर आदींची भाषणे झाली.