जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 'तुमच्या पोटदुखीवर आमच्याकडे जालीम औषध', मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोमणा

'तुमच्या पोटदुखीवर आमच्याकडे जालीम औषध', मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोमणा

'सत्तेतून पायउतार झाल्यानंतर तुमच्या डोळ्यात अंधारी आली आहे. त्यामुळे आमचे काम दिसत नाही

'सत्तेतून पायउतार झाल्यानंतर तुमच्या डोळ्यात अंधारी आली आहे. त्यामुळे आमचे काम दिसत नाही

‘सत्तेतून पायउतार झाल्यानंतर तुमच्या डोळ्यात अंधारी आली आहे. त्यामुळे आमचे काम दिसत नाही

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 03 मार्च : ‘निवडणुकासमोर ठेवून आम्ही काम करत नाही. अजितदादा तुम्ही गोड बोलतात, पण तुमच्या कार्यक्रम सुरू असतो. त्यामुळे पोटदुखीचे प्रसंग वारंवार येतील, त्यामुळे जालीम औषध शोधून ठेवले आहे. बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू केला आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना लगावला. विधान सभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विरोधकांना चांगलेच चिमटे काढले. ‘सत्तेतून पायउतार झाल्यानंतर तुमच्या डोळ्यात अंधारी आली आहे. त्यामुळे आमचे काम दिसत नाही. दिसत असलं तरी तुम्ही बोलत नाही. चांगल्याला चांगलं म्हणण्याचं विरोधकांचं काम आहे, तुमचं मोती बिंदूचं ऑपरेशन करावं लागेल’, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. ‘अडीच वर्षांमध्ये सगळे प्रकल्प थांबले होते. तुम्ही सुद्धा होता तिथे, पुढील दोन वर्षांमध्ये सर्व प्रकल्प मार्गी लावणार आहे. महाराष्ट्रापुढे नवीन चित्र निर्माण करणार आहे. या राज्यातील इन्फ्रा प्रकल्प सादर करणार आहोत’, असंही शिंदे म्हणाले. (Pune Bypoll election Results : चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या वाटेत ‘काटे’, पण उद्धव ठाकरेंनी सांगितलं वेगळंच गणित) ‘दावोसमध्ये मागच्या वेळी 50 हजार कोटींचे करार झाले होते. त्या कंपनीचे नाव घेत नाही, पण एकाही कंपनीची गुंतवणूक झाली नाही. दिल्लीची कंपनी होती. सामजस्य करार होते, आपल्याकडे गुंतवणूक मोठी येईल, असंही शिंदे म्हणाले. (संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची चौकशी करा, मनसे नेत्याची खळबजनक मागणी) दावोसमध्ये ४२ कोटी रुपये खर्च झाले बोलतात पण प्रत्यक्षात ३५ कोटी रुपये खर्च झाले आहे. महाराष्ट्र पॅव्हिलियेन सर्वात चांगले होते. मागच्या वर्षा मध्य प्रदेश पॅव्हिलियेनमधून खूर्चा आणि टेबल आणावे लागले होते. आमच्याकडे जागा आहे, इंडस्ट्रीसाठी जागा आहे, सोईसुविधा आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर आपल्याकडे गुंतवणूक सुरू झाली आहे. आता आपल्याकडे रोजगार निर्माण झाले आहे, असं आश्वासनही शिंदेंनी दिलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात