मुंबई, 03 मार्च : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फायरब्रँड नेते संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. पण, या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांची चौकशी करा अशी मागणी मनसेचे नेते अमय खोपकर यांनी केली आहे. आज सकाळी शिवाजी पार्कमध्ये अज्ञात लोकांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांना स्टम्पने मारहाण केली. तर हा हल्ला परतवून लावण्याच्या प्रयत्नात संदीप देशपांडे यांच्या हाताला जबर मार लागला. या हल्ल्यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. या हल्ल्यामागे कोण आहे याचा शोध घ्यावा अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. ( संदीप देशपांडेंना अखेर डिस्चार्ज, राज ठाकरे स्वत: गेले शिलेदाराला घ्यायला! ) या हल्ल्या प्रकरणी मला १०० टक्के खात्री आहे की हा हल्ला संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंनी केला आहे. संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंच्या गुंडांनी हा भ्याड हल्ला केला आहे. रोज स्वत:ला मर्द मर्द म्हणतात आणि भ्याड हल्ला करतात, अशी टीका अमेय खोपकर यांनी केली. (संजय राऊत यांच्यावर शरद पवार नाराज, उद्धव ठाकरेंसमोरच बोलून दाखवलं) दरम्यान, काही दिवसांपूर्वी संदीप देशपांडे यांनी युवासेना पदाधिकारी वैभव थोरात यांचा महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढला होता. या प्रकरणात त्यांच्यावर प्रकरण दाबण्यासाठी वारंवार फोन केले जात होते, अशी माहिती मिळाली आहे. कोण संदीप देशपांडे? संजय राऊतांची प्रतिक्रिया मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. या प्रकरणावर संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. ‘संदीप देशपांडेंवर कोण आहेत ते? कुठे राहतात ते? कोणत्याही नागरिकांवर या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे हल्ले होणं हे कायद्याने चांगल्या सुव्यवस्थेचे लक्षण नाही, कुणी असेल सामन्य कार्यकर्ता असेल, राजकीय कार्यकर्ता असेल. मग उपमुख्यमंत्र्यांनी सांगणं हे सणसनाटी निर्माण करण्यासाठी करत असल्याचे असं सांगणं हे हल्लेखोरांना बळ मिळत आहे, जिथे निवडणुका असेल तिथे जाऊन कायदा आणि सुवस्था हातात घेतली जाते, असं असेल तर आम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागेल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.