JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Jitendra Awahad : अजित पवारांसोबत गेलेले किती आमदार संपर्कात? आव्हाडांनी आकडाच सांगितला

Jitendra Awahad : अजित पवारांसोबत गेलेले किती आमदार संपर्कात? आव्हाडांनी आकडाच सांगितला

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार आमच्या संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

जाहिरात

जितेंद्र आव्हाड

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 जूलै : अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोठा दावा केला आहे. अजित पवारांसोबत जे आमदार गेले आहेत, त्यातील 9 सोडले तर सर्व जण आमच्या संपर्कात असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. अमोल कोल्हे काल अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. मात्र आज त्यांनी ट्विट करत आपण शरद पवार यांच्यासोबतच असल्याचं सांगितलं आहे. यावरून देखील आव्हाड यांनी जोरदार टोला लगावला आहे. शरद पवार यांच्या समर्थनार्थ आणखी एक जण बाहेर पडले आहेत, ते म्हणजे अमोल कोल्हे. अमोल कोल्हे यांना फसवून नेण्यात आलं होतं असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

दरम्यान आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावरून देखील आव्हाड यांनी टोला लगावला आहे. विधानसभा अध्यक्ष कधी कोणाच्या घरी जात नाहीत, अध्यक्ष बायस नसतात. विधानसभा अध्यक्षांनी कसं वागावं यांची संहिता आहे. त्यांनी कोणाला झुकते माप देऊ नये असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या