JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Cabinet Expansion : अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त ; तारीख आली समोर, अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रिपदं?

Cabinet Expansion : अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त ; तारीख आली समोर, अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रिपदं?

अखेर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर आली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तातडीनं निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे .

जाहिरात

लवकरच होणार मंत्रिमंडळाचा विस्तार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 जुलै :  मोठी बातमी समोर येत आहे. अखेर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली आहे. 9 किंवा 10 जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. त्यामुळे संबंधित मंत्र्यांना त्या -त्या खात्याची माहिती असावी यासाठी आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून, येत्या 9 किंवा 10 जुलैला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बैठक गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची बैठक नंदनवन या शासकीय निवासस्थानी पार पडली. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. उर्वरित मंत्रीमंडळाच्या विस्तारात भाजप व शिवसेनेच्याच  आमदारांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे आमदार शपथ घेणार नसल्याचं समोर आलं आहे. आमदारांमध्ये नाराजी?  गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. शिवसेना आणि भाजपचे आमदार आपल्याला मंत्रिपद मिळावं यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. मात्र अजित पवार हे महायुतीसोबत आल्यानं त्यांच्यासह 9  जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाची खाती ही राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता असल्यानं शिवसेनेचे आमदार नाराज असल्याची चर्चा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या