रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 16 फेब्रुवारी: बाजारामध्ये अनेकदा अन्नपदार्थांत भेसळ झाल्याचे प्रकार समोर येतात. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. महाशिवरात्रीनिमित्त देशात मोठ्या संख्येने लोक उपवास करत असतात. या काळात उपवासाच्या पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. त्यात भेसळ होण्याची शक्यता असते. विशेषत: भगरीत सर्वाधिक भेसळ होते. त्यामुळे बीडमधील अन्न व औषध प्रशासनाने भगर खरेदी करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
भगरीत भेसळ, आरोग्याला फटका महाशिवरात्रीच्या अनुषंगाने किराणा दुकानात मोठ्या प्रमाणात भगरीची आवक होत आहे. भगरीची मागणी जास्त असल्याने अनेकदा भगरीमध्ये भेसळ झाल्याच्या घटना समोर येतात. उपवास असल्याने पोट रिकामे असते. अशा काळात भेसळयुक्त भगर खाल्ल्यास आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. मळमळणे, उलटी, जुलाब, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्धवू शकतात. त्यामुळे भगर खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना बीडच्या अन्न व औषध प्रशासनाने केल्या आहेत. ज्वारी काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांपुढं गंभीर प्रश्न! कशी सुटणार अडचण? Video भगर खरेदी करताना काय काळजी घ्यावी भगर व इतर पदार्थ खरेदी करतांना परवानाधारक, नोंदणी धारका कडूनच खरेदी करावी. पॅकबंद असलेले उपवासाचे पदार्थच विकत घ्यावेत. सदर पाकिटावर उत्पादकाचा तपशील, परवाना क्रमांक इत्यादी तपासून खरेदी करावेत. एफएसएसआय प्रमाणित भगरच खरेदी करावी. पाकिटावर प्रक्रीया उद्योगात भगरीचे उत्पादन केव्हा झाले? याचा तपशील असतो, तो निट पाहून घ्यावा. त्यासह भगरीची अंतीम वापरण्याची मुदत केव्हा कालबाह्य होते ते ही तपासून आणि खात्री करूनच खरेदी करावी. लग्नामध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरी, टोळी CCTV कॅमेऱ्यात कैद, एका मुलीचाही समावेश भगरीचे पीठ घेताय? भगरीचे सुटे पीठ खुल्या बाजारातून घेणे शक्यतो टाळावे. भाकरी न करता भगरीला स्वच्छ धुऊन त्याची खिचडी करून खावी. दशम्याच बनवायच्या असतील तर बाजारातून पॅकबंद भगर खरेदी करून ती स्वच्छ करावी आणि नंतर स्वच्छ धुवून घरगुती पध्दतीने पीठ तयार करावे. शक्यतो भगरीच्या पिठाचा वापर एका दिवसात करावा. तसेच खरेदी केलेल्या भगरीचे विक्रेत्याकडून पक्के खरेदी बील घ्यावे, असे आवाहन बीडमधील अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी इम्रान हाशमी यांनी केले आहे. वंदे भारत निर्मितीतही ‘लातूर पॅटर्न’ संपूर्ण देशाची भागणार गरज, Video नवरात्रोत्सवात 150 हून अधिक जणांना विषबाधा दरम्यान, बीडमध्ये नवरात्रोत्सवात उपवासाच्या पदार्थांतून दीडशेहून अधिक जणांना विषबाधा झाली होती. त्यातील बहुसंख्य लोकांनी भगरीची दशमी खाल्ली होती. त्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीच्या काळात होणारे भेसळीचे प्रकार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन अॅक्शनमोडवर आले आहे. मोंडा परिसरातील दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच भगरीच्या किरकोळ विक्रीवरही प्रशासनाचे लक्ष आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची भेसळ आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.