ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 16 फेब्रुवारी : नव्या भारताची रेल्वे अशी ओळख असलेली वंदे भारत एक्स्प्रेस आता महाराष्ट्रातूनही सुरू झालीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर या दोन ‘वंदे भारत’ रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला. नाशिक, पुणे सारखी राज्यातील महत्त्वाची शहरं या एक्स्प्रेसच्या नकाशावर आली आहेत. संपूर्ण राज्यात ‘वंदे भारत’ बद्दल मोठी उत्सुकता असून या गाडीचं प्रत्येक स्टेशनवर जल्लोषात स्वागत होत आहे. आगामी काळात देशभर ‘वंदे भारत’ चं जाळं आणखी व्यापक करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. केंद्र सरकारची ही योजना प्रत्यक्षात आणण्यामध्ये लातूरची महत्त्वाची भूमिका असेल. लातूर जिल्ह्यामध्ये वंदे भारत एक्स्प्रेसच्या बोगीची निर्मिती होणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या या घोषणेनंतर आजवर शिक्षणासाठी ओळखला जाणाऱ्या ‘लातूर पॅटर्न’ चं आता वंदे भारत निर्मितीमध्ये योगदान असणार आहे. कधी सुरू होणार कारखाना? लातूर शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर कोच फॅक्टरीचं काम पूर्ण झालंय. साडेतीनशे एक्स्प्रेस एकर परिसरात ही कोच फॅक्टरी आहे. या फॅक्टीरच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय. रेल्वेकडे हस्तांतराची प्रक्रिया सुरू आहे. येथील बोगी निर्मितीचं काम खाजगी कंपनीला देण्यात येणार असून ती प्रक्रिया ही गतिमान पद्धतीने चालू असल्याची माहिती आहे. Vande Bharat Express Train : कशी आहे मुंबई-सोलापूर ‘वंदे भारत’? पाहा Inside Photos पियूष गोयल रेल्वेमंत्री असताना लातूरमधील रेल्वे कोच फॅक्टीरीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर युद्धपातळीवर या फॅक्टरीसाठी जमीन संपादन करणे आणि बांधकाम पूर्ण करणे हा काम करण्यात आली. रेल्वे कोचनिर्मिती करणारा हा देशातील चौथा कारखाना असेल. दीड वर्षांपूर्वी म्हणजेच ऑगस्ट 2021 मध्ये हा कारखाना कोच निर्मिती करण्यासाठी सक्षम आहे, हे सिद्ध झालं होतं. सध्या काही कायदेशीर प्रक्रिया सुरू असून एप्रिलपर्यंत या प्रक्रिया पूर्ण होतील. लातूरकरांना रोजगार या विषयातील मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे आणि खासगी कंपनीमध्ये याबाबत करार होणार आहे. कामगार आणि कर्मचारी यांची नियुक्ती करताना 70:30 हे तत्व पाळले जाईल. यामध्ये 70 टक्के स्थानिक आणि 30 टक्के इतर भागातील कर्मचारी घेण्याचं संबंधित कंपनीला बंधनकारक करण्यात येईल. आजीबाई जोरात, 75 वा वाढदिवस केला ‘वंदे भारत’मध्ये साजरा, Video लातूर आणि मराठवाड्यातील अनेक कुशल कामगारांना आणि कर्मचाऱ्यांना इथं संधी मिळणार आहे.पहिला फेजमध्ये वर्षाला 120 कोच, दुसऱ्या फेजमध्ये 400 तर तिसऱ्या फेजमध्ये वर्षाला 700 कोची निर्मीती या कारखान्यात होईल. पहिल्या फेजचं कामपूर्ण झालंय. ‘लातूर शहर आणि जवळच्या परिसरातील अनेक उद्योगांना यामुळे चालना मिळेल,’ असा विश्वास ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर यांनी व्यक्त केलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.