जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Beed News: ज्वारी काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांपुढं गंभीर प्रश्न! कशी सुटणार अडचण? Video

Beed News: ज्वारी काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांपुढं गंभीर प्रश्न! कशी सुटणार अडचण? Video

Beed News: ज्वारी काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांपुढं गंभीर प्रश्न! कशी सुटणार अडचण? Video

बीड जिल्ह्यात ज्वारीच्या काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु, ज्वारी काढण्यासाठी मजूरच मिळत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

  • -MIN READ Bid,Bid,Maharashtra
  • Last Updated :

    रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 15 फेब्रुवारी: निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना बऱ्याचदा अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात शेती कोरडवाहू असल्यास केवळ पावसाळी पिकेच घ्यावी लागतात. त्यामुळे बीड जिल्ह्यात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु, आता शेतकऱ्यांपुढे वेगळंच संकट निर्माण झाला आहे. ज्वारी काढणीला आली असून मजूर मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    शेतीसाठी पाणी नसल्याने ज्वारीकडे कल बीड जिल्ह्यामध्ये शेतीसाठी पाणी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकरी ज्वारी, कांदा, तूर, गहू या पिकांची लागवड करतात. यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी केली होती. शेतीची कामे शेतकरी बहुधा घरीच करतात. परंतु, शेती क्षेत्र जास्त असेल तर मजुरांची गरज भासते. Beed: पांढऱ्या तुरीला परराज्यातून मागणी, चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी खूश, Video मजुरी वाढवूनही मजूर मिळेना सध्या बीडमध्ये ज्वारीच्या काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता आहे. शेतकरी पती-पत्नीच्या जोडीला एक हजार रुपये मोजायला तयार आहे. पण यापेक्षा जास्त रोज मिळेल अशी मजुरांची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना मात्र यापेक्षा अधिक मजुरी देणे परवडणारे नाही. त्यातच मजुरांची मागणी जास्त असल्याने अधिक मजुरी देऊनही मजूर मिळत नाहीत, अशी स्थिती आहे. Maharashtra Monsoon Update: धोक्याची घंटा! मान्सूनबद्दल हवामान विभागाची धक्कादायक माहिती यंदा जोडीला हजार रुपये देण्यास शेतकरी तयार ज्वारी पिकाची काढणी सुरू असून पती-पत्नीच्या जोडीला एकत्रित मजुरी ठरविली जाते. 2021 साली पती पत्नीच्या जोडीला ज्वारी काढण्यासाठी 700 रुपये रोज होता. तर 2022 मध्ये 900 रुपये इतकी मजुरी झाली होती. यंदा एक हजार रुपये दर देण्यासाठी शेतकरी तयार आहे. पण मजुरांच्या अपेक्षा वाढतच आहेत. त्यामुळे मजूर मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात