जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Beed News : लग्नामध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरी, टोळी CCTV कॅमेऱ्यात कैद, एका मुलीचाही समावेश

Beed News : लग्नामध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरी, टोळी CCTV कॅमेऱ्यात कैद, एका मुलीचाही समावेश

Beed News : लग्नामध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरी, टोळी CCTV कॅमेऱ्यात कैद, एका मुलीचाही समावेश

गेल्या काही दिवसापासून माजलगाव शहरातील वेगवेगळ्या मंगल कार्यालयात चोरीच्या घटना घडल्या आहेत.

  • -MIN READ Bid,Maharashtra
  • Last Updated :

बीड, 16 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. आर्थिक फसवणूक तसेच चोरीच्याही घटना उघडकीस येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नामध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारी टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बीडच्या माजलगाव शहरातील व्यंकटेश मंगल कार्यालयात लग्न सुरू होता. यावेळी लग्न सुरू असताना महिलेच्या दागिन्यांची पर्स चोरी गेल्याची घटना घडली होती. प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी करणारे चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. यामध्ये एका अल्पवयीन मुलगी आणि एक तरूण असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसापासून माजलगाव शहरातील वेगवेगळ्या मंगल कार्यालयात चोरीच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवप्रताप मंगल कार्यालयात मुक्ता चंद्रकांत रननवरे यांच्या पर्समध्ये ठेवले पाच तोळे सोने आणि दोन लाख रुपये कॅश असलेली पर्स चोरीला गेली होती. त्यानंतर व्यंकटेश मंगल कार्यालयतही तशीच घटना घडली. यामुळे लग्नामध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या टोळीला अटक करावा अशी मागणी होत आहे. हेही वाचा -  डोंगरी परिसरात बॉम्बस्फोटाची अफवा; पोलिसांनी आवळल्या मुसक्या; आरोपी म्हणतो.. साताऱ्यात पैशाच्या हव्यासापोटी एक वर्षाची मुलगी ठेवणी गहाण - एका महिलेने कर्ज घेण्याच्या बदल्यात आपल्या चिमुरडीलाच तारण ठेवल्याची घटना साताऱ्यात घडली होती. धक्कादायक म्हणजे कर्जाची परतफेड केल्यानंतर तारण ठेवलेल्या मुलीला परत करण्यास पैसे देणाऱ्यांनी नकार दिला. यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर संबंधित महिलेला अटक करण्यात आली. या घटनेतील आरोपी महिलेला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. यावेळी एकविसाव्या शतकातही मुलींचा वापर वस्तू म्हणून आणि आर्थिक फायद्यासाठी साधन म्हणून केला जात असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात