JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धनंजय मुंडेंसोबत एकत्र येण्याची चर्चा, पंकजा मुंडेंच्या कारखान्यावर मोठी रेड

धनंजय मुंडेंसोबत एकत्र येण्याची चर्चा, पंकजा मुंडेंच्या कारखान्यावर मोठी रेड

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या कारखान्यावर छापा पडला आहे.

जाहिरात

पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर जीएसटी विभागाचा छापा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 13 एप्रिल : बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी पथकाचा छापा पडला आहे. जीएसटी थकवल्यामुळे ही रेड पडल्याची माहिती समोर येत आहे. सकाळी दहा वाजल्यापासून जीएसटीचे अधिकारी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची चौकशी करत आहेत.  नेमक्या कोणत्या प्रकरणात ही चौकशी होत आहे. याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. मात्र आज सकाळपासून ही चौकशी सुरू आहे. एकाच व्यापपीठावर हजेरी गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांची धनंजय मुंडेंसोबत जवळीक वाढत आहे. दोघे बहिण भाऊ आज एकाच व्यासपिठावर येणार आहेत. बीडच्या मानूर गावात आज गहिनाथ गडाच्या 90 व्या फिरता नारळी सप्ताहाची सांगता आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्र येणार आहेत. मात्र दुसरीकडे आज पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाकडून रेड टाकण्यात आली आहे. भगवान बाबांच्या नारळी सप्ताहाला हजेरी  दरम्यान  संत भगवान बाबा यांच्या फिरत्या नारळी सप्ताहात देखील भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्र आल्याचं पहायला मिळालं. एकाच आठवड्यात दोघे बहिण, भाऊ दोनदा एकाच व्यासपीठावर आल्यानं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या वाढत्या जवळीकीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या