JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महाविकास आघाडीला मिळणार नवा भिडू? आणखी एक पक्ष सोबत यायला तयार

महाविकास आघाडीला मिळणार नवा भिडू? आणखी एक पक्ष सोबत यायला तयार

महाविकास आघाडीत आता आणखी एका नव्या पक्षाची भर पडण्याची शक्यता आहे.

जाहिरात

महाविकास आघाडीत आणखी एका पक्षाची एन्ट्री?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर, 14 मे  :  एमआयएमचे खासदार  इम्तियाज  जलील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी आम्ही कसलीही आणि कुठेही कुर्बानी देण्यासाठी तयार आहोत. आम्ही महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इम्तियाज जलील यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. नेमकं काय म्हणाले जलील?  आम्ही महाविकास आघाडीसोबत आघाडी करण्यास तयार आहोत. भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी आम्ही कसलीही आणि कुठेही कुर्बानी देण्यास तयार असल्याचं जलील यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी  भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपकडून दोन पक्षांमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोदींना वाटतं की तेच कायमस्वरूपी पंतप्रधान राहणार आहेत. मात्र न्यूटनचा एक नियम आहे, जी वस्तू वर जाते ती तेवढ्याच वेगानं खाली देखील येते. मात्र मोदी खाली येईपर्यंत देशाचं मोठं नुकसान झालेलं असेल, असा घणाघात जलील यांनी केला आहे.

दरम्यान दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत युती केली आहे. मात्र अद्यापही वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत एन्ट्री मिळालेली नाहीये. त्यामुळे एमआयएमला महाविकास आघाडीत स्थान मिळणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या