JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ज्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात त्या दिवसाला 'ड्राय डे' का बरं म्हणतात? काय आहे कारण?

ज्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात त्या दिवसाला 'ड्राय डे' का बरं म्हणतात? काय आहे कारण?

देशात असे काही दिवस ठरवलेले असतात, ज्या दिवशी दारूची दुकानं बंद (Alcohol Shops) ठेवली जातात. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, की तुम्ही राहत असलेल्या परिसरात किंवा शहरात दारूची दुकानं काही ठरावीक दिवशी बंद असतात. अशा दिवसांना ड्राय डे (Dry Day) असं म्हटलं जातं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 मार्च: देशात असे काही दिवस ठरवलेले असतात, ज्या दिवशी दारूची दुकानं बंद (Alcohol Shops) ठेवली जातात. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, की तुम्ही राहत असलेल्या परिसरात किंवा शहरात दारूची दुकानं काही ठरावीक दिवशी बंद असतात. अशा दिवसांना ड्राय डे (Dry Day) असं म्हटलं जातं. या दिवशी दारूची विक्री केली जात नाही. फक्त बोलीभाषेतच नव्हे, तर कागदोपत्रीसुद्धा ड्राय डे हा शब्द वापरला जातो. नवं वर्ष सुरू झाल्यानंतर मद्यप्रेमी ड्राय डे कधी आहे, याची माहिती पहिल्यांदा घेतात. त्यानुसार ड्राय डेच्या आधीच आपली व्यवस्था करून ठेवतात; पण तुम्हाला माहीत आहे का, की दारूची दुकानं बंद ठेवायची असलेल्या दिवसांना ‘ड्राय डे’ असंच का म्हटलं जातं? ड्राय डे घोषित करण्यामागे अनेक कारणं आहेत. वर्षातले काही खास दिवस उदा. राष्ट्रीय सण आणि धार्मिक सणांच्या दिवशी ड्राय डे पाळला जातो. राष्ट्रीय सण, स्वातंत्र्यसैनिक यांच्या सन्मानार्थ असलेले दिवस आणि धार्मिक सणांच्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात. याशिवाय काही वेळा कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून एखाद्या विशिष्ट शहरात किंवा राज्यात ड्राय डे जाहीर केला जातो. तसंच एखाद्या भागात निवडणुका असल्या, की त्या भागात ड्राय डे जाहीर केला जातो. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेतला जातो. हे वाचा- इतर रंगाव्यतिरिक्त पांढऱ्या रंगाचाच का असतो टॉयलेट पेपर? हे आहे कारण देशातल्या प्रत्येक राज्यात ड्राय डे वेगवेगळे असतात. 2 ऑक्टोबर, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ड्राय डे संपूर्ण देशभर पाळला जातो. त्याशिवाय प्रत्येक राज्य आपल्या प्रदेशातले सण पाहून किंवा विशिष्ट दिवशी मद्यविक्रीवर बंदी घालतं. राज्य आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाची धोरणं वेगवेगळी असून त्यानुसार ड्राय डेची तारीख ठरवली जाते. निवडणुका होत असताना मतदानाच्या ठिकाणीही दारूविक्रीवर बंदी असते. ‘नो अल्कोहोल डे’ला ‘ड्राय डे’ म्हणावं, याला कोणतंही विशिष्ट कारण नाही. तरी, ड्राय हा शब्द एखाद्याने काहीही प्यालेलं नाही, या अर्थाने वापरला जातो. एखाद्याने पाणी, रस किंवा इतर कोणतंही पेय घेतलं नाही, तरी त्या संदर्भात ड्राय डे या शब्दाचा वापर केला जातो. त्यामुळे दारूसाठीही हे वापरले जाऊ शकते. He’s gone dry now असं इंग्रजीमध्ये म्हणतात. ज्या दिवशी कोणी दारू पिऊ शकत नसेल, त्याला ड्राय डेशी जोडलं जातं; पण हे काही निश्चित कारण नव्हे. हे वाचा- ऑन कॅमेरा फक्त खाऊन महिन्यालाच 7 कोटी कमावते; असं काय आहे हिच्या VIDEOमध्ये पाहा पंजाब राज्याच्या उत्पादन शुल्क कायद्यात 1926 साली पहिल्यांदा ड्राय डेचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर 1950 मध्ये केंद्राने संपूर्ण भारतात ड्राय डे लागू केला होता. यानंतर सरकारी कागदपत्रांमध्येही ड्राय डे हा शब्द वापरात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या