मुंबई, 8 मार्च- आपल्या दैनंदिन वापरातील काही गोष्टी एकाच ठराविक रंगाच्या असतात. आपल्यालादेखील त्या एकाच रंगात पाहण्याची सवय झालेली असते. त्या गोष्टी एका ठराविक रंगाच्याच का असतात? याबाबत आपण कधी विचारही करत नाही. अशाच गोष्टींमध्ये टॉयलेट पेपरचा (Toilet Paper) समावेश होतो. टॉयलेट पेपर हा आपल्या बाथरूममधील एक महत्त्वाची वस्तू आहे. तुमच्यापैकी बहुतेकजण त्याचा दररोज वापरही करत असाल. पण, त्याचा रंग फक्त पांढराच (White) का असतो, याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का? टॉयलेट पेपर विविधरंगी नसण्यामागे एक कारण आहे. हे कारण जाणून घेण्यापूर्वी टॉयलेट पेपर कसा बनवला जातो, हे जाणून घेणं गरजेच आहे. या कराणामुळे योतो पांढरा रंग आता आपल्या वापरात असणारे टॉयलेट पेपर नेहमी पांढऱ्याच रंगाचे आढळतात. पण, पूर्वी असं नव्हतं. 1950 च्या दशकात टॉयलेटमध्ये रंगीत कागद (Colorful Toilet Paper) वापरले जायचे. ते वेगवेगळ्या रंगाचे होते. पुढे टॉयलेट पेपर अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि रंगांचा वापर टाळण्यासाठी ते फक्त पांढऱ्या रंगात तयार करण्यात आले. त्यामुळे आता आपल्याला फक्त पांढऱ्या रंगाचे टॉयलेट पेपर दिसतात. टॉयलेट पेपर झाडांपासून किंवा रिसायकल्ड पेपरपासून (Recycled Paper) बनवला जातो. टॉयलेट पेपर ज्या रिसायकल्ड पेपरपासून बनवला जातो तो आधीच पांढरा असतो. म्हणून, त्यांच्यापासून तयार केलेला टॉयलेट पेपरही पांढरा (Toilet Paper Color) होतो. हे खूप साधं लॉजिक असलं तरी त्याला अधिक पांढरा करण्यासाठी त्यात ब्लीचचा (Bleach) देखील वापर केला जातो. ब्लीचमुळे त्याला एकदम स्वच्छ पांढरा रंग येतो. वाचा- कितीही खायला घाला कधीच भरत नाही याचं पोट; 10 वर्षीय लेकाच्या भुकेमुळे पालक हैराण झाडातील फायबरशिवाय या घटकांपासून देखील बनवला जातो टॉयलेट पेपर रीडर्स डायजेस्टच्या रिपोर्टनुसार, ज्या फायबरपासून टॉयलेट पेपर बनवला जातो, तो नैसर्गिकरित्या पांढरा (Natural White) असतो. झाडातील फायबरशिवाय इतर टाकाऊ कागदांपासूनही टॉयलेट पेपर बनवला जातो. प्रिंटरमधून वाया गेलेले कागद, जुने कागद आणि रद्दी यांचाही वापर टॉयलेट पेपर बनवण्यात होतो. या प्रक्रियेमध्ये कटाक्षानं ब्लीचचा वापर होतो. या प्रक्रियेत ब्लीचचा वापर केल्यानंतर त्यातील खराब भाग पूर्णपणे निघून जातो आणि तो अधिक पांढरा होतो. टॉयलेट पेपर निर्मितीमध्ये (Toilet Paper Making) स्वतंत्रपणे रंग वापरला जात नाही, म्हणून ते पांढरे असतात. वाचा- महिलांमध्ये होणारे हे आहेत कॉमन 6 आजार; त्याकडं दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात या देशात केला जातो मोठ्या प्रमाणात टॉयलेट पेपरचा वापर ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात टॉयलेट पेपरचा वापर होतो. चीन, जर्मनी, इटली, कॅनडा, मेक्सिको हे टॉयलेट पेपरचे जगातील सर्वात मोठे निर्यातदार (Toilet Paper Export) देश आहेत. हे देश वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा टॉयलेट पेपर निर्यात करतात. यावरून आपण त्याच्या वापराची कल्पना करू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.