मुंबई, 09 मार्च : खाद्यपदार्थांमार्फत पैसे कमाई करणं नवं नाही. कुणी पदार्थ विकून, कुणी हॉटेल सुरू करून तर कुणी अगदी सोशल मीडियावर रेसिपीचे व्हिडीओ पोस्ट करूनही पैसे कमावतं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक महिला मात्र फक्त ऑन कॅमेरा खाऊन खाऊनच पैसे कमावते आहे. म्हणजे दुसऱ्यांना खायला घालून नव्हे तर स्वतः खाऊन ही महिला कमाई करते. महत्त्वाचं म्हणजे खाताना जी गोष्ट करू नये, असा सल्ला दिला जातो ती गोष्ट करूनच ही तरुणी कोट्यवधी रुपये कमावते (Woman make millions chewing weird food). सामान्यपणे खाताना तोंडाचा आवाज करू नये, असं आपल्याला सांगितलं जातं. नेमकं हेच ही तरुणी करते. तिच्या खाण्याच्या आवाजावरच लोक फिदा आहेत. तिला खाताना पाहून त्यांना आनंद मिळतो आणि आपले असे व्हिडीओ पोस्ट करून ही महिला महिन्याला कमी कमी साडेसात कोटी रुपये कमावते. हे वाचा - कितीही खायला घाला कधीच भरत नाही याचं पोट; 10 वर्षीय लेकाच्या भुकेमुळे पालक हैराण कॅनडाच्या आँटॅरियामध्ये राहणारी 27 वर्षांची नाओमी मॅकरे (Naomi McRae) तिच्या या विचित्र प्रोफेशनबाबत ऐकून सर्वजण हैराण झाले आहेत. तिच्या खाण्याचा आवाज ऐकण्यासाठी आणि तिला खाताना पाहण्यासाठी तिला युट्यूबवर 7.7 दशलक्ष लोक फॉलो करतात. HunniBee नावाने ती सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. 80 लाख लोक तिचं चॅनेल पाहतात.
या व्हिडीओला ASMR म्हणजे autonomous sensory meridian म्हटलं दातं. यात खाताना होणाऱ्या एका विशिष्ट आवाज ऐकून लोकांना समाधान मिळतं. तिच्या व्हिडीओतील आवाज ऐकून त्यांच्या शरीरात एक वेगळाच उत्साह संचारतो. त्यांना शांत झोप लागण्यातही मदत मिळते. हे वाचा - बापरे! ‘या तरुणीच्या सुंदर ओठांमुळे देश धोक्यात’, PHOTO पाहताच लोक दहशतीत नाओमी स्वतः ASMR च्या अधीन होती, त्याचवेळी तिला ही आयडिया आली. तिने 2019 साली हे काम सुरू केलं. आता ती यामध्ये इतकी यशस्वी झाली आहे की तिने आपलं फिटनेसचं करिअरही सोडलं आहे आणि पूर्ण वेळ ती हेच काम करते.
आता ती मायक्रोनवर अगदी जवळून बाटलीचं झाकण उघडणं, बिस्कीट किंवा चॉकलेट खाण्याचा आवाज काढते आणि लोकांना ते आवडतं. आता ती विचित्र आवाज काढते आणि महिन्याला साडेसात कोटी रुपये सहजपणे कमावते. या पैशांतून ती जगही फिरते.