नुपूर पाटील, प्रतिनिधी मुंबई 25 मार्च : वाढदिवस किंवा एखाद्या शुभकार्याच्या प्रसंगी आपण जवळच्या व्यक्तींना भेटवस्तू देतो. ही भेटवस्तू इतरांपेक्षा वेगळी असावी त्याचबरोबर आकर्षक पद्धतीनं पॅक करण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो. त्यासाठीच कमी किंमतीमध्ये आकर्षक गिफ्ट बॉक्स
मुंबईतील
चर्नी रोड परिसरातील एका दुकानात तुम्हाला खरेदी करता येतील. कोणते प्रकार उपलब्ध? या दुकानात कार्डबोर्ड, लाकडी, झूट कापड, लेदर, मेटल, असे विविध प्रकारचे हव्या त्या मापाचे बॉक्स उपलब्ध आहेत. यावर्षी G20 परिषदेच्या निमित्तानं झालेल्या बैठकांसाठी वापरण्यात आलेले गिफ्ट बॉक्स देखील इथं उपलब्ध आहेत. ‘आमच्याकडे कस्टमाईज पद्धतीनं गिफ्ट बॉक्स तयार करुन मिळतात. वेगवेगळे सुंदर रंग आणि आकर्षक बॉक्सचं कलेक्शन इथं आहे. अनेक कॉर्पोरेट कंपन्या गिफ्टसाठी बॉक्स मागवतात. सध्या पेस्टल रंगांना चांगलीच मागणी आहे, अशी माहिती ‘द बॉक्स कंपनी’ या दुकानाचे विक्रेता मनोज गाला यांनी दिली.
बांधणीचे ड्रेस सर्वात स्वस्त मिळणारी मुंबईतील जागा, कमी पैशांमध्ये होईल मस्त शॉपिंग, Video
काय आहे किंमत? या दुकानात तुम्हाला 50 ते 60 प्रकारचे बॉक्स पाहायला मिळतात. कार्डबोर्डचे बॉक्स 50 ते 1000 रुपयांच्या दरम्यान आहेत. त्याचबरोबर इतर बॉक्सही कमी किंमतीमध्ये तुम्हाला मिळतात. तुम्हाला हवी असलेली टी प्रिंट त्यावर छापून मिळते. त्याचबरोबर कार्यक्रमात देण्यासाठी सुंदर गिफ्ट रॅप करुन मिळते. या गिफ्ट रॅपिंगसाठी वेगवेगळे ट्रे आणि टोपल्याही इथं उपलब्ध आहेत.
उन्हाळ्यात कॉटन कुर्ती हवीच! ‘इथं’ करा मुंबईतील सर्वात स्वस्त खरेदी! Video
कुठं आहे दुकान? द बॉक्स कंपनी,गायवाडी गिरगाव, मुंबई- 400004