मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Mumbai Wholesale Market : बांधणीचे ड्रेस सर्वात स्वस्त मिळणारी मुंबईतील जागा, कमी पैशांमध्ये होईल मस्त शॉपिंग, Video

Mumbai Wholesale Market : बांधणीचे ड्रेस सर्वात स्वस्त मिळणारी मुंबईतील जागा, कमी पैशांमध्ये होईल मस्त शॉपिंग, Video

X
Mumbai

Mumbai Wholesale Market : बांधणीचे ड्रेस खरेदी करण्यासाठी मुंबईतील सर्वात स्वस्त जागा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Mumbai Wholesale Market : बांधणीचे ड्रेस खरेदी करण्यासाठी मुंबईतील सर्वात स्वस्त जागा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नुपूर पाटील, प्रतिनिधी

  मुंबई, 23 मार्च :  बांधणीचे ड्रेस हा प्रकार महिलांमध्ये सध्या चांगलाच लोकप्रिय आहे. कोणत्याही गटातील महिलांना बांधणीचे ड्रेस शोभून दिसतात. या ड्रेसचा विचार केला की अनेकांना गुजरात राज्य पहिल्यांदा आठवते. गुजरातमधील गांधीनगरमधील बांधणीचे ड्रेस चांगलेच फेमस आहेत. पण, आता या ड्रेससाठी गुजरातचा विचार करण्याची गरज नाही. आपल्या मुंबईतही होलसेल भावात हे ड्रेस मिळतात

  मुंबईच्या दादर मार्केटमधील दुकाना विविध रंगाचे आणि पॅटर्नचे बांधणीचे ड्रेस मटेरियल मिळतात. अगदी अस्सल कॉटनची  बांधणी असल्यामुळे या ़ड्रेसला चांगली मागणी आहे. लग्नसमारंभ किंवा घरगुती कार्यक्रमात या प्रकारचे ड्रेस घालण्यास अनेक महिलांची पसंती असते.

  उन्हाळ्यात कॉटन कुर्ती हवीच! 'इथं' करा मुंबईतील सर्वात स्वस्त खरेदी! Video

  कोणते प्रकार मिळतात?

  बांधणी ही कापडावर विशिष्ट पद्धतीने गाठ बांधून तयार केली जाते. कॉटन, सिल्क अश्या विविध प्रकारच्या कपडावर ही डिझाईन तयार केली जाते. उन्हाळा आला की कॉटनच्या बांधणी ड्रेसची मागणी वाढते.  बांधणीच्या पण वेगवेगळ्या डिझाईनचा यामध्ये समावेश असतो.  बांधणी वायफाय डिझाईन, बांधणी लखनवी वर्क, बांधणी ऑल ओव्हर बुट्टा कॉटन सॅटिन, बांधणी जयपुरी कॉटन, बांधणी गुल्टी डिझाईन, बांधणी कॉटन सॅटिन, बांधणी झूमकी डिझाईन, बांधणी चेक्स डिझाईन, बांधणी लखनवी तार वर्क, या वेगवेगळ्या डिझाईनचे 10 - 12 रंग इथं तुम्हाला पाहता येतील.

  काय आहे किंमत?

  या बांधणी ड्रेसला संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांमधून होलसेल खरेदीसाठी विक्रेते येथेच येतात. 500 रुपये ते 1000 रुपयांच्या आत बांधणी ड्रेस मटेरियल मिळतात. लखनवी वर्क आणि लखनवी तार वर्क या डिझाईनला मोठी मागणी आहे. या दुकानातील लखनवी वर्कचे कापड खास आहे.

  कुठे मिळते मटेरियल?

  दादरमधील हिंदमाता हा परिसर कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे.  विशेषत: इथं महिलांच्या कपड्यांचे अनेक प्रकार मिळतात. याच परिसरात राजलक्ष्मी क्रियएशन या दुकानात बांधणीचे ड्रेस मटेरियल होलसेल भावात मिळतात.

  गूगल मॅपवरून साभार

  दुकानाचा पत्ता : राजलक्ष्मी क्रिएशन, शॉप नंबर 9, गोविंदजी केणी रोड,हिंदमाता, दादर पूर्व.

  फोन नंबर : 022 2411 6550,  +91 84838 48324

  First published:
  top videos

   Tags: Lifestyle, Local18, Mumbai, Shopping