जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Mumbai Wholesale Market : उन्हाळ्यात कॉटन कुर्ती हवीच! 'इथं' करा मुंबईतील सर्वात स्वस्त खरेदी! Video

Mumbai Wholesale Market : उन्हाळ्यात कॉटन कुर्ती हवीच! 'इथं' करा मुंबईतील सर्वात स्वस्त खरेदी! Video

Mumbai Wholesale Market : उन्हाळ्यात कॉटन कुर्ती हवीच! 'इथं' करा मुंबईतील सर्वात स्वस्त खरेदी! Video

Mumbai Wholesale Market : उन्हाळा आला की अनेक महिला कॉटनच्या कुर्ती घालणं पसंत करतात. या खरेदीसाठी मुंबईतील बेस्ट जागा आम्ही सांगणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नुपूर पाटील, प्रतिनिधी मुंबई, 9 मार्च :  उन्हाळा आला की जीवाची लाही लाही होते. घट्ट कापडे वापरले तर त्वचेवर पुरळ उठते. स्किन इन्फेक्शन होते. त्यामुळे अनेक महिला कॉटनचे कपडे वापरणे पसंद करतात. आज आम्ही तुम्हाला मुंबईतील एका प्रसिद्ध दुकानाबद्दल सांगणार आहोत. या दुकानात फक्त कॉटनची कुर्ती मिळतात. मुंबईतील दादर म्हणजे कपडे खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. येथे प्रत्येक ऋतुनुसार कपडे मिळतात. त्यामुळे कपडे खरेदीच्या बाबतीत मुंबईकरांची पहिली पसंती दादरलाच असते. दादर येथे एक लहानसं दुकान आहे. या दुकानात 12 महिने फक्त कॉटनचेच कुर्ती, शर्ट्स मिळतात. येथील दुकानाचे मालक गेल्या 30-35 वर्षांपासून येथे हा व्यवसाय करीत आहे. उन्हाळा आला रे आला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कॉटनच्या कुर्ती काकांकडे उपलब्ध होतात. मऊ आणि प्युअर कॉटनच्या कुर्ती घेण्यासाठी येथे महिला नेहमी येतात. मुंबईतील ‘या’ मार्केटमध्ये लेडीज चप्पल मिळतात सर्वात स्वस्त, पाहा Video काय आहे वैशिष्ट्य? कॉटन, मलमल, कलमकारी या विविध प्रकारच्या कुर्ती येथे मिळतात. यामध्ये शॉर्ट कुर्ती आणि लॉंग कुर्ती असतात. उन्हाळा असल्यामुळे लाईट रंग जास्त विकले जातात. त्यासाठी पांढरा तसेच पेस्टल कलर येथे मिळतात. यामुळे उन्हाची तीव्रता जास्त जाणवत नाही. खिश्याचे कुर्ती सुद्धा येथे उपलब्ध आहेत. तसेच जीन्स वर घालण्याचे टॉप येथे मिळातात. अशी माहिती विक्रेता नयन स्वामी यांनी दिली.

    News18लोकमत
    News18लोकमत

    किती आहे किंमत? कॉटनची कुर्ती 250 रुपये ते 700-800 रुपयांपर्यंत येथे मिळातात. अगदी कमी किमतीत सुंदर कुर्ती मिळत असल्यामुळे मुंबईच्या कानकोपऱ्यातून ग्राहक येथे येतात. याच कुर्ती मोठ्या दुकानातून घेतल्या तर 5 ते 10 पट महाग मिळतात. शनिवारी व रविवारी येथे खुप गर्दी असते तसंच दादरच पूर्ण मार्केट सोमवारी बंद असलं तरी हे दुकान सोमवारीही सुरूच असते.

    गूगल मॅपवरून साभार

    कुठे आहे हे दुकान? गजानन क्लोथ स्टोअर आर.के. वैद्य मार्ग, दादर पश्चिम, दादर, मुंबई  - 400028

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात