प्रतीकात्मक फोटो
break upमुंबई, 3 मार्च : प्रेमात खूप शक्ती असते असं वाक्य अनेकदा ऐकलं असेल. प्रेमात पडलेल्या व्यक्तींना याचा प्रत्यय अनेकदा येतो; पण प्रेमाने आयुष्य जसं आनंदी होतं, तसं उद्ध्वस्तही होऊ शकतं. प्रेम यशस्वी झालं नाही, तर अनेकांना निराशा येते. सुरळीत चाललेलं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त होतं. याला लव्ह ट्रॉमा सिंड्रोम म्हणतात. प्रेमामध्ये आलेल्या अपयशामुळे निराशा आली असेल, तर यातून बाहेर कसं पडावं, याबाबत मानसोपचारतज्ज्ञांकडून जाणून घेऊ या. आपलं ज्याच्यावर प्रेम आहे, त्या व्यक्तीशी असलेले संबंध दुरावले, तर त्याने मानसिक त्रास होतो. निराशा येते. कोणी याला ब्रेक-अप म्हणतात. लग्न झालं असेल तर घटस्फोट म्हणतात. काही जण यातून सावरतात; मात्र काही जण विचित्र मानसिक अवस्थेत जातात. नात्यांविषयीची कटुता मनात भरते. याला लव्ह ट्रॉमा सिंड्रोम म्हणतात. मानसोपचार तज्ज्ञ रिचर्ड रॉस यांनी 1999 मध्ये लव्ह ट्रॉमा सिंड्रोमचं मॉडेल विकसित केलं होतं. एखादं प्रेमाचं नातं तुटल्यावर जी गंभीर लक्षणं माणसामध्ये जाणवतात, त्यांबाबत रॉस यांनी त्या मॉडेलमध्ये सांगितल्याचं मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनिल शेखावत सांगतात. ही समस्या बराच काळ राहते. तसंच यामुळे लोकांच्या सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक प्रगतीवर परिणाम होतो. लव्ह ट्रॉमा सिंड्रोमबाबत महत्त्वाच्या गोष्टी अशा व्यक्ती खूप जास्त भावनाप्रधान होतात. अनेक प्रकारच्या भावनांना सामोरं जाणं त्यांना अवघड होतं. एकटेपणा व निराशा येते. उपेक्षित असल्याची भावना प्रबळ होते. कधी अचानक सकारात्मक वाटतं, तर कधी एकदम नकारात्मक भाव जागृत होतात. काही जणांना भावनारहित झाल्यासारखं वाटतं. या अभ्यासात असं जाणवलं, की ब्रेक-अपचा परिणाम 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत राहतो. त्या काळात या सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये काही लक्षणं आढळतात. - अशा व्यक्तींमध्ये सतत अपयशाची भावना जागृत होते. वाचा - जगात ही फक्त एकटीच अशी कोंबडी, शोधूनही कुठेच सापडणार नाही; तिच्यात काय खास पाहा - भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल खूप तिरस्कार निर्माण होतो. डॉ. शेखावत यांच्या म्हणण्यानुसार, अशी लक्षणं जास्त काळ जाणवली, तर समुपदेशनाची गरज असते. स्वतःबद्दल नकारात्मक भावना मनात राहिली, तर जवळच्यांपासून दूर होण्याची भीती सतत निर्माण होते. हळूहळू मन निराशेकडे जाऊ लागतं. अशा व्यक्तींचा आत्मविश्वास कमी होतो. अपयश, नाकारल्याची भावना यामुळे मनातली भीती वाढतच जाते, असं अनेक संशोधनांमध्ये समोर आलं आहे.
लव्ह ट्रॉमा सिंड्रोमवर उपचार समोरच्याला क्षमा करून या सिंड्रोममधून बाहेर पडता येईल का याबाबत एक अभ्यास करण्यात आला. कटुपणाने तुटलेली नाती मनात राग आणि निराशा निर्माण करतात. एकमेकांना कधीच माफ न करण्याबाबत निर्धार केला जातो. डॉ. रॉस यांनी त्यांच्या अभ्यासात क्षमा करण्यावर जास्त भर दिला. नातं तुटलं तर एक तर समोरच्याला दोष दिला जातो किंवा स्वतःला दोष दिला जातो. दोन्हीही बाबतीत मनात द्वंद्व चालूच राहतं. त्यासाठी समोरच्याला किंवा स्वतःलाही क्षमा करून पुढे गेलं तर मनातला राग कमी होतो. क्षमा करण्याचं महत्त्व रुग्णाला पटवून दिलं जातं. समुपदेशनाद्वारे या समस्येतून बाहेर पडण्यास मदत केली जाते. या समस्येला सामाजिक वातावरण जबाबदार आपल्या समाजात घटस्फोट सहजपणे स्वीकारला जात नाही. एकमेकांविषयी राग, घृणा मनात साचून राहते. यामुळेच सूडाची भावना जागृत होते व सगळ्या गोष्टी बिघडतात. चित्रपट विश्वही याला जबाबदार असल्याचं दिल्ली विद्यापिठातल्या शिक्षिका व स्त्रीवादी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. अनेक गाण्यांमधून ब्रेक-अपचा संबंध सुडाशी जोडलेला दाखवला आहे. नात्यामध्ये हिंसा किंवा शोषण झालं नसेल व त्या व्यक्तीशी पटत नसेल, तर सामोपचारानं घटस्फोट घेणं इष्ट असतं. म्हणूनच प्रेमात ब्रेक-अप किंवा घटस्फोट झाला, तर स्वतःचं व इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त न करता पुढे जाणं महत्त्वाचं असतं. यामुळे निराशा व इतर मानसिक समस्यांपासून सुटका होते.