ही कोंबडी जिचं नाव पीनट असं आहे, सध्या ती जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. कारण ही कोंबडी इतकी खास आहे की जगात ही अशी एकटीच कोंबडी आहे. कुठेही शोधलात तरी अशी कोंबडी तुम्हाला सापडणार नाही.
यूएएसच्या मिशिगनमध्ये असलेली पीनट. जिचा जन्म 2002 साली झाला. बँटम प्रजातीची ही कोंबडी आहे. सामान्य कोंबड्यांच्या आकारापेक्षा तिचा आकार लहान असतो.
मर्सी म्हणाली, ज्यामध्ये पीनट होती, ते अंड थंड होतं. मला वाटलं पिल्लू जिवंत नसेल म्हणून मी ते फेकून देणार होती. पण अचानक त्यातून आवाज आला. तेव्हा मी अंड फोडलं आणि त्यातून पीनट बाहेर आली.
पीनटच्या आईने तिचा स्वीकार केला नाही, त्यानंतर पीनट मर्सीच्या घरात पोपटाच्या पिंजऱ्यातच वाढली. नंतर ती मर्सीकडे असलेल्या इतर प्राण्यांशीही तिची मैत्री झाली.
आता पीनटचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे तो तिच्या वयामुळे. सर्वसामान्यपणे कोंबड्यांचं आयुष्य 5 ते 10 वर्षे असतं. पण पीनटला तब्बल 20 वर्षे झाली आहेत.
1 मार्च 2023 रोजी पीनट 20 वर्षे 304 दिवसांची झाली. त्यामुळे ती आता जगातील सर्वात जास्त जगणारी कोंबडी बनली आहे. दोन दशकं जगण्याचा रेकॉर्ड तिने केला आहे.