JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / मरना मना है! इथं कधी कुणीच मरत नाही; धक्कादायक आहे कारण

मरना मना है! इथं कधी कुणीच मरत नाही; धक्कादायक आहे कारण

एरवी आपण जगणं मुश्किल झालं असं म्हणतो पण इथं मरणंही मुश्किल आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 डिसेंबर : मृत्यू (Death) हा अटळ आहे हे आपल्याला माहितीच आहे. मृत्यू कुणालाच चुकत नाही. पण मरण हे कुणाच्या हातातही नसतं. कधी, कुठे, कसा कुणाचा मृत्यू होईल सांगता येत नाही. असं असतानाही काही अशी ठिकाणं आहेत जिथं मृत्यूवर बंदी आहे. एरवी आपण जगणं मुश्किल झालं असं म्हणतो पण इथं मरणंही मुश्किल आहे (Weird rule). जगात काही शहरं अशी आहेत जिथं अटळ असलेल्या मृत्यूवरच प्रतिबंध लावण्यात आले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तसे कायदेही बनवण्यात आले आहेत. मृत्यू म्हणजे इथं कायद्याने गुन्हा मानला जातो. मरायचं असेल तर दुसऱ्या शहरात जाऊन मरावं लागतं. आता असं का? तर याची कारणं वेगवेगळी आणि तितकीच धक्कादायक आहे. अशी कोणती शहरं आहेत जिथं मृत्यूला बंदी आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल. चला तर पाहुयात. इत्सुकुशिमा जापानी द्वीप इत्सुकुशिमा (Itsukushima)  हे एक पवित्र ठिकाण मानलं जातं. इथं 1868  सालापर्यंत जन्म आणि मृत्यूची परवानगी नव्हती. आजही याठिकाणी स्मशानभूमी किंवा रुग्णालय नाही.

लँजारोन स्पेनमधील लँजारोनमधील कब्रस्तानात खूप गर्दी असायची. त्यामुळे ग्रेनाड प्रांतातील महापौरांनी 1999 साली मृत्यूवर प्रतिबंध लावला होता. हे पाऊल म्हणजे आंशिक रुपात मजा म्हणून आणि आंशिक रुपात राजकारणाचा भाग म्हणून समजलं गेलं. पण खरोखरच अशी बंदी लागू करण्यात आली. हे वाचा -  एक गोळी खाऊन मिळणार व्यायामाइतकेच फायदे; शास्त्रज्ञांनी शोधला अनोखा मार्ग जोपर्यंत नगरपालिका अधिकाऱ्यांना एक नवीन कब्रस्तान मिळत नाही तोपर्यंत 4000 लोकांना जिवंत राहण्याचा सल्ला देण्यात आला. कुग्नॉक्स फ्रान्सच्या कुग्नॉक्समधील महापौर 2007 साली एक कब्रस्तान खोलण्याची परवानगी मिळवण्यात अपयशी ठरले. यानंतर जवळपास 17,000 लोकसंख्या असलेल्या या शहरात त्यांनी मृत्यूवरच प्रतिबंध लावला. त्यानंतर स्थानिक कब्रस्तान वाढवण्याची परवानगी देण्यात आली. लाँगइअरब्येन नॉर्वेतील हे छोटंसं शहर आर्कटिकच्या जवळ असल्याने इथं तापमान खूप थंड असतं. ज्यामुळे मृत शरीर सडत नाही आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे इथं मरणं आणि दफन करणं कायद्याने गुन्हा आहे. हे वाचा -  ज्वालामुखीचा उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पळापळ, धडकी भरवणारा VIDEO VIRAL जर कुणी मरणाच्या स्थितीत असले तर त्याला नॉर्वेतील  अशा दुसऱ्या शहरात पाठवलं जातं, जिथं असा कायदा नाही. ले लवंडौ फ्रान्समधील या शहरातील महापौरांनी 2000 साली मृत्यूवर प्रतिबंध लावला होता. पर्यावरणासंबंधी समस्यामुळे इथं नवीन कब्रस्तानाला परवानगी न मिळाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. शहरात लोकांना मरण्यास मनाई असल्याचा कायदा 2000 साली लागू करण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या