जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ही गोळी खाऊन मिळणार व्यायामाइतकेच फायदे; चांगल्या आरोग्यासाठी शास्त्रज्ञांनी शोधला अनोखा मार्ग

ही गोळी खाऊन मिळणार व्यायामाइतकेच फायदे; चांगल्या आरोग्यासाठी शास्त्रज्ञांनी शोधला अनोखा मार्ग

ही गोळी खाऊन मिळणार व्यायामाइतकेच फायदे; चांगल्या आरोग्यासाठी शास्त्रज्ञांनी शोधला अनोखा मार्ग

अनेक लोकांसाठी नियमित व्यायाम (Exercise) करणं म्हणजे फार कठीण काम ठरतं. अशा लोकांसाठी शास्त्रज्ञांनी एक अनोखा मार्ग शोधून काढला आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली 08 डिसेंबर : सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत (Lifestyle) आरोग्याची व्यवस्थित काळजी न घेतल्यानं सहजपणे अनेक लहान-मोठे आजार होतात. हाय ब्लडप्रेशर (Blood Pressure) आणि डायबेटिस (Diabetes) हे तर केवळ आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळं (Eating Habits) आणि आळशी जीवनशैलीमुळं आपल्या शरीरात घर करतात. हे टाळण्यासाठी डॉक्टर नेहमी नियमित आहार (Daily Diet) आणि नियमित व्यायामाचा (Daily Exercise) सल्ला देतात. जर आपण आपल्या खाण्यापिण्याच्या आणि व्यायामाच्या सवयींमध्ये नियमीतपणा ठेवला तर हृदय आणि मेंदूच्या अनेक आजारांपासून सहज दूर राहू शकतो. मात्र, अनेक लोकांसाठी नियमित व्यायाम (Exercise) करणं म्हणजे फार कठीण काम ठरतं. काही आजारी व्यक्ती आणि वृद्ध व्यक्तींची तब्येत बिघडल्यानं त्यांना नियमित व्यायाम करता येत नाही. त्यामुळं व्यायामाच्या मदतीनं चांगलं आरोग्य मिळवणं त्यांना शक्य होत नाही. अशा लोकांसाठी शास्त्रज्ञांनी एक अनोखा मार्ग शोधून काढला आहे. संशोधकांनी अशा एका गोळीचा शोध लावला आहे, जी खाल्ल्यानं शरीराला व्यायामाइतकाच फायदा होईल. थंडीच्या मोसमात ताक प्यायल्यानं प्रतिकारशक्ती होते बूस्ट; जाणून घ्या अनेक फायदे सायन्स डेलीच्या (Science Daily) अहवालानुसार, ऑस्ट्रेलियन संशोधकांनी एक मॉलिक्युलर सिग्नल (Molecular signals) शोधला आहे. हा सिग्नल औषधी गोळीच्या (Medicine Pill) रूपात घेतल्यास आपल्या शरीराला व्यायामाप्रमाणेच न्यूरॉलॉजिकल (Neurological) फायदे मिळतील. एएनयू (ANU) म्हणजेच ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीनं (Australian National University) हा रिसर्च केला आहे. ‘आम्हाला आशा आहे की या शोधामुळं गोळीच्या माध्यमातून आम्ही लोकांना व्यायामाचा फायदा देऊ शकतो,’ अशी प्रतिक्रिया एएनयूमधील अभ्यासकांनी दिली. तज्ज्ञ काय म्हणतात ही गोळी व्हिटॅमिनच्या गोळ्याप्रमाणे (vitamin tablet) घेता येऊ शकते. जी व्यायामादरम्यान एक मॉलिक्युलर सिग्नल देईल. जे लोक प्रत्यक्ष व्यायाम करू शकत नाहीत, अशांना याची मदत होईल. अल्झायमर आणि पार्किन्सन्ससारख्या (Alzheimer’s and Parkinson’s) आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांनाही याचा फायदा होईल. या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये आजारवाढीचा वेग कमी होईल, अशी माहिती एनएयूचे असोसिएट प्रोफेसर आणि क्लियर व्हिजन रिसर्चचे प्रमुख रिकार्डो नाटोली (Riccardo Natoli) यांनी दिली.

    लक्ष द्या! रडू आल्यास अश्रूंना वाट करून द्या मोकळी; थांबवून ठेवल्यास होतील आजार

    कसा होतो फायदा संशोधकांचे म्हणणं आहे की, वाढत्या वयोमानानुसार आपल्या शरीरातील न्यूरॉन्स कमकुवत होऊ लागतात. परंतु, जेव्हा शरीरात मॉलिक्युलर सिग्नल पाठवला जातो तेव्हा न्यूरॉनची स्थिती सुधारू शकते. ही गोळी नेमकं हेच काम करते. अल्झायमर आणि पार्किन्सन्स ग्रस्त लोकांमध्ये व्यायामामुळं स्मरणशक्ती आणि मोटर कोऑर्डिन्स सुधारतो, असे बरेच पुरावे मिळाले आहेत. औषधे फक्त ठराविक लोकांसाठीच उपलब्ध असावीत एएनयूमध्ये झालेल्या संशोधनाच्या मदतीनं भविष्यात अशा प्रकारची गोळी प्रत्यक्षात तयार करण्यात आल्यास ती सर्वसामान्यांना उपलब्ध करून देऊ नये, असा इशाराही संशोधकांनी दिला आहे. ज्यांच्या शरीराची हालचाल खूपच कमी आहे, अशा रुग्णांसाठीच ती राखीव ठेवावी, असंही संशोधक म्हणाले आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात