नवी दिल्ली, 9 डिसेंबर : ज्वालामुखींचा देश अशी ओळख असलेल्या इंडोनेशियातील (Indonesia) जावा (Java) या सर्वाधिक दाट लोकसंख्येच्या बेटावर नुकताच एका मोठ्या ज्वालामुखीचा (Volcano) उद्रेक झाला. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर लोक आपला जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने धावत असल्याचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माऊंट सेमेरू (mount Semeru) असे या ज्वालामुखीचे नाव असून, तो पूर्व जावाच्या लुमाजांग जिल्ह्यात आहे. त्याच्या भीषण उद्रेकामुळे 11 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला आहे. या ज्वालामुखीच्या उद्रेकाचे प्रत्यक्ष दर्शन घडवणाऱ्या या व्हिडीओमध्ये आकाशात धुराचा, राखेचा अतिप्रचंड लोळ उठत असल्याचे दिसत असून, आपला जीव वाचवण्यासाठी ओरडत धावणारे लोक दिसत आहेत. यात लहान मुले, महिला, पुरुष आदींचा समावेश आहे. जीव वाचवण्यासाठी मदतीची याचना करताना दिसत आहेत. अतिशय हृदयद्रावक आणि भीतीदायक असा हा व्हिडीओ आहे. लाव्हाचा हा प्रचंड लोळ संपूर्ण आसमंत व्यापताना दिसत आहे. त्याचे महाकाय स्वरूप जीवाचा थरकाप उडवणारे आहे. इथले लोक किती धोकादायक स्थितीत राहतात याची कल्पना या दृश्यावरून येते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. बीएनओ न्यूजने ही व्हिडीओ क्लिप शेअर केली असून, आतापर्यंत जवळपास 38 लाख लोकांनी ती पाहिली आहे.
Semeru... pic.twitter.com/0lW17U5nBp
— Burhan Ar (@MBurhanuddin3) December 4, 2021
युरोपातल्या या ज्वालामुखी पर्वताची वाढतेय उंची, सतत पडतो राखेचा पाऊस ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे आकाशातून राख (Ash) , माती आणि दगडांचा (Stones) वर्षाव झाला. यातून निघणाऱ्या राखेचा आणि धुळीचा थर इतका जाड आहे की संपूर्ण जावा बेटावर दिवसादेखील रात्र असल्याचा भास होत होता. उद्रेक झाल्यानंतरही अनेक दिवस या ज्वालामुखीतून राख आणि धूर बाहेर पडत असल्यानं आसपासच्या गावांमधील घरांवर राखेचे थर जमा झाले आहेत. ज्वालामुखीच्या या उद्रेकानंतर इथं पाऊस पडल्यानं राखेमुळे प्रचंड चिखल झाला आहे. इंडोनेशिया सरकारकडून बचावकार्य सुरू करण्यात आलं असून, शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. अद्यापही बचावकार्य सुरू असल्याचं वृत्त आहे. या भीषण आपत्तीमुळे नागरिकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले असून, इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी (Indonesia’s President) यातून बचावलेल्या लोकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला आहे. दरम्यान, राख, धूर यामुळे या भागातील सर्व विमान सेवा बंद करण्यात आल्या आहेत. लालभडक नव्हे तर निळाशार; असा ज्वालामुखी तुम्ही कधी पाहिलात का? इंडोनेशिया हा देश पृथ्वीवरील पॅसिफिक रिंग ऑफ फायर भागात येतो. जगातील सर्वाधिक म्हणजे जवळपास 50 टक्के सक्रिय ज्वालामुखी इंडोनेशियाच्या भोवताली आहेत. इंडोनेशियात जवळपास 130 सक्रिय ज्वालामुखी आहेत. इतर देशांच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. सक्रिय ज्वालामुखी अधिक असल्यामुळे या भागात भूकंपही मोठ्या प्रमाणात होतात. पृथ्वीवरील 75 टक्के भूकंप या भागात होतात.