JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच ओळखा ही धोक्याची घंटा

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच ओळखा ही धोक्याची घंटा

मुंबई, 22 फेब्रुवारी : मानवी शरीराला अनेक प्रकारची पोषकतत्त्वं, प्रथिनं आणि अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वांची म्हणजेच व्हिटॅमिन्सची गरज असते. या पैकी कोणत्याही गोष्टीची थोडीशी कमतरता असेल तर माणूस आजारी पडू लागतो. याच नियमानुसार, आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर शरीरात अनेक लक्षणं दिसू लागतात. आपल्या शरीराला दररोज 2.4 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन बी 12 आवश्यक असतं. एवढ्या कमी प्रमाणात आवश्यक असलेल्या घटकाची कमतरता मात्र शरीरासाठी धोका निर्माण करू शकतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 फेब्रुवारी : मानवी शरीराला अनेक प्रकारची पोषकतत्त्वं, प्रथिनं आणि अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वांची म्हणजेच व्हिटॅमिन्सची गरज असते. या पैकी कोणत्याही गोष्टीची थोडीशी कमतरता असेल तर माणूस आजारी पडू लागतो. याच नियमानुसार, आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर शरीरात अनेक लक्षणं दिसू लागतात. आपल्या शरीराला दररोज 2.4 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन बी 12 आवश्यक असतं. एवढ्या कमी प्रमाणात आवश्यक असलेल्या घटकाची कमतरता मात्र शरीरासाठी धोका निर्माण करू शकतो. व्हिटॅमिन बी 12 ला कोबालमिनदेखील म्हणतात. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, व्हिटॅमिन बी 12 हे व्हिटॅमिन बीच्या आठ प्रकारांपैकी एक आहे. मानवी शरीरातील मज्जासंस्थेच्या सामान्य कार्यासाठी त्याची आवश्यकता असते.

सैंधव मीठ व सामान्य मिठात फरक काय? आरोग्यासाठी कोणते असते जास्त फायदेशीर

संबंधित बातम्या

झाडं आणि वनस्पती व्हिटॅमिन बी 12 ची निर्मिती करत नसल्यामुळे, त्याच्या सेवनासाठी मांस, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांवर अवलंबून रहावे लागतं. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास काही लक्षणं दिसू लागतात. कधीकधी याच्या कमतरतेची लक्षणं दुसर्‍या आजाराच्या लक्षणांसारखी असू शकतात. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून लक्षणं जाणवल्यास वैद्यकीय तपासणी करणं, हाच योग्य पर्याय आहे.

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास खालील लक्षणं दिसू लागतात 1. हात आणि पायांना मुंग्या येणं : व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे हाता-पायांना मुंग्या येतात. शिवाय असे लोक पाय जास्त पसरून चालतात. हे अस्थिर चालणं आरोग्याच्या इतर स्थितींचही लक्षण असू शकतं. पण, व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमध्ये हे लक्षण सर्रास दिसून येतं. व्यक्तीच्या शरीरात सुन्नपणा देखील येऊ शकतो ज्यामुळे एकूण हालचालींवर परिणाम होतो. 2. जिभेला फोड येणं : व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे जिभेवर फोड येतात. जीभ सुजणं हे व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचे सुरुवातीचं लक्षण असू शकतं. अनेकदा जीभ लाल होते आणि त्यासोबत सुई टोचल्यासारखी जाणीव होते. 3. हृदयाचे ठोके वाढणं : व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे हृदयातल्या ठोक्यांची गती वाढते. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असते तेव्हा रक्त पंप करण्यासाठी हृदयावर अतिरिक्त ताण येतो. 4. त्वचेवर पिवळसरपणा येणं : व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास त्वचेवर पिवळसरपणा येऊ शकतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची त्वचा पिवळी पडत असल्यास त्वरित तपासणी केली पाहिजे. Superfood : आता निरोगी राहणे सहज होईल शक्य; फक्त रात्री जेवणानंतर खा हे दोन पदार्थ 5. दिसण्यात अडचण येणं : व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे व्यक्तीला दिसण्यात अडचण येते. बघायला त्रास होत असेल तर एकदा रक्ताची तपासणी केली पाहिजे. या शिवाय व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे स्मरणशक्ती कमी होणं, अशक्तपणा येणं इत्यादी लक्षणंही दिसतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या