मुंबई, 07 सप्टेंबर : निरोगी आणि तणावमुक्त राहण्यासाठी हल्ली आपण खूप काही करतो. योग्य आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, बाहेरचे पौष्टिक नसलेले पदार्थ टाळणे या सर्व गोष्टी आपण काटेकोरपणे पाळतो. मात्र तरीही कधीकधी आपल्या काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आपण काहीतरी जास्तीचे प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. एक आम्ही तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही सहज निरोगी राहू शकता. जेवणानंतर एकत्र करून खा गूळ आणि तूप गुळामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखे पोषक तत्व अढळतात. तर खाल्ल्याने व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ई मिळते. हे मिश्रण केवळ आरोग्यदायी नाही तर ते चवदारदेखील आहे आणि तुमची गोड खाण्याची इच्छा यामुळे पूर्ण होते.
जेवल्यानंतर लगेच का येते झोप? फक्त आळसच नाही तर हे आहे वैज्ञानिक कारणप्रसिद्ध पोषणतज्ञ रुजुता दिवेकर यांच्या मते, हे शक्तिशाली मिश्रण रोग प्रतिकारशक्ती वाढवेल आणि हार्मोन्सला मदत करेल. त्यांनी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, “लोह आणि आवश्यक फॅटी अॅसिडस्ने समृद्ध, हा कॉम्बो फक्त गोड खाण्याची इच्छाच पूर्ण करत नाही तर हार्मोन्स आणि रोगप्रतिकारशक्तीला देखील मदत करते.”
जेवणानंतर गूळ आणि तूप खाण्याचे फायदे - गूळ आणि तूप एकत्र खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. - या दोन्हींच्या मिश्रणाने हार्मोनशी संबंधित समस्यांवर मात करता येते. - गूळ आणि तूप खाल्ल्याने साखरेची तल्लफ कमी होते आणि ब्लड शुगर वाढत नाही. - गूळ आणि तुपाचे हे मिश्रण सुपरफूडदेखील मानले जाते. यामुळे तुम्हाला तंदुरुस्त राहण्यास मदत होते.