जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सैंधव मीठ व सामान्य मिठात फरक काय? आरोग्यासाठी कोणते असते जास्त फायदेशीर

सैंधव मीठ व सामान्य मिठात फरक काय? आरोग्यासाठी कोणते असते जास्त फायदेशीर

सैंधव मीठ व सामान्य मिठात फरक काय? आरोग्यासाठी कोणते असते जास्त फायदेशीर

आज आम्ही तुम्हाला मिठाचे प्रकार कोणकोणते असतात आणि त्यांपैकी आपल्या आरोग्यासाठी कोणते मीठ जास्त फायदेशीर आहे? याबद्दल माहिती देणार आहोत.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 22 फेब्रुवारी : मीठ हा आपल्या स्वयंपाक घरातील महत्त्वाचा घटक आहे. मिठाशिवाय अन्नाला चव येणं शक्यच नाही. मीठ खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि जवळजवळ प्रत्येकजण त्याचं सेवन करतो. आज आम्ही तुम्हाला मिठाचे प्रकार कोणकोणते असतात आणि त्यांपैकी आपल्या आरोग्यासाठी कोणते मीठ जास्त फायदेशीर आहे? याबद्दल माहिती देणार आहोत. साधारणपणे मीठाचे तीन प्रकार असतात, ते सामान्य मीठ, सैंधव मीठ आणि काळं मीठ असे आहेत. सामान्य मीठ समुद्र किंवा खाऱ्या तलावाच्या पाण्यातून तयार केलं जातं आणि मशीनमध्ये शुद्ध केलं जातं. सैंधव मीठ जमिनीखाली खडकाच्या स्वरूपात असतं ते पूर्णपणे नैसर्गिक आहे. काळं मीठसुद्धा सैंधव मिठासारखं आहे. ही तिन्ही मीठं सोडियम क्लोराईडचे उत्तम स्रोत आहेत. या संदर्भात ‘एबीपी लाइव्ह’ने वृत्त दिलंय. Superfood : आता निरोगी राहणे सहज होईल शक्य; फक्त रात्री जेवणानंतर खा हे दोन पदार्थ कोणतं मीठ चांगलं? सामान्य मिठात 97 टक्के सोडियम क्लोराईड असतं तर रिफायनिंगदरम्यान तीन टक्के इतर गोष्टी मिसळल्या जातात. या पैकी आयोडीन मुख्य असतं. गॉयटर आजार होऊ नये, म्हणून आयोडीन मिसळलं जातं. सैंधव मीठ जमिनीच्या खाली आढळतं. त्यात 85 टक्के सोडियम क्लोराईड असतं व उर्वरित 15 टक्क्यांमध्ये आयर्न, कॉपर, झिंक, आयोडीन, मॅंगेनीज, मॅग्नेशियम, सेलेनियम यासारखे किमान 84 प्रकारचे घटक असतात. ही खनिजं शरीरासाठी फायदेशीर असतात.

    News18लोकमत
    News18लोकमत

    सैंधव मीठात वरून आयोडीन मिसळण्याची गरज नाही, पण सामान्य मीठात मिसळावं लागतं. सैंधव मीठ नैसर्गिक आहे आणि त्यात फारसे बदल केले जात नाहीत, त्यामुळे ते आरोग्यासाठी चांगलं असतं. आयुर्वेदात याला खूप महत्त्व आहे. सैंधव मिठामधील अनेक खनिजं पाण्यातही आढळतात. पण आता पाणी शुद्ध करून पिण्याची प्रथा वाढली आहे, त्यामुळे पाण्यातील खनिजं आपल्याला मिळत नाहीत. त्यामुळेच आजकाल सैंधव मिठाचा ट्रेंड वाढला आहे. हे तुलनेने महाग आणि खड्यांसारखं असल्याने जेवणात मिसळत नाही. पण याचा अर्थ ते रिफाइंड केलं गेलेलं नाही. म्हणजेच एखादी गोष्ट जितकी कमी रिफाइंड तितकी ती अधिक नैसर्गिक असते. रिफाइंड केल्याने त्यातील महत्त्वपूर्ण खनिजं निघून जातात. अनेक आजारांवर प्रभावी अनेक प्रकारची खनिजं असल्यामुळे सैंधव मीठ अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी प्रभावी आहे. हे फक्त शरीराच्या आतच नाही तर चेहरा आणि केसांनाही सुंदर बनवते. सामान्य मिठाच्या अतिवापराने ब्लड प्रेशर वाढण्याची समस्या उद्भवते. पण, सैंधव मीठ ब्लड प्रेशर नियंत्रित करतं. त्याचप्रमाणे रोग प्रतिकारशक्ती आणि स्टॅमिना दोन्ही वाढवते. या शिवाय, सायनसवर उपचार करण्यासाठी हे उपयुक्त आहे. सैंधव मिठाचा योग्य वापर केल्याने वजन वाढत नाही आणि वजन कमीही होतं. ज्यांना झोप येत नाही, त्यांना सैंधव मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो. या मिठाने बॉडी स्क्रब करता येते. यामुळे त्वचा चमकदार होते. हे केसांनाही लावले जाते. हिरड्या स्वच्छ करण्यासाठी हे मीठ खूप प्रभावी ठरते. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे मायग्रेन होतो, पण सैंधव मीठ त्याची पूर्तता करते. बद्धकोष्ठतेच्या समस्येवरही हे फायदेशीर आहे. याने आपली रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते. जेवल्यानंतर लगेच का येते झोप? फक्त आळसच नाही तर हे आहे वैज्ञानिक कारण त्यामुळे तुम्ही विचार करून रोजच्या स्वयंपाकात कुठलं मीठ वापरायचं हे ठरवू शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात