JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Cancer पासून वाचण्यासाठी व्हॅक्सिनची भूमिका ठरेल महत्त्वाची, संशोधकांचा मोठा दावा

Cancer पासून वाचण्यासाठी व्हॅक्सिनची भूमिका ठरेल महत्त्वाची, संशोधकांचा मोठा दावा

काही विशिष्ट विषाणू कॅन्सरला (Cancer) कारणीभूत ठरतात. अशा विषाणूंचा संसर्ग झाल्यावर लगेच नाही, पण काही वर्षांनंतर संबंधित व्यक्तीला कॅन्सर होण्याची शक्यता असते. जाणून घ्या यावर व्हॅक्सिन कसं गुणकारी ठरेल

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 फेब्रुवारी: काही विशिष्ट विषाणू कॅन्सरला (Cancer) कारणीभूत ठरतात. अशा विषाणूंचा संसर्ग झाल्यावर लगेच नाही, पण काही वर्षांनंतर संबंधित व्यक्तीला कॅन्सर होण्याची शक्यता असते. हिपॅटायटिस बी (Hepatitis B), ह्युमन पॅपिलोमा यांसारख्या विषाणूंना प्रतिबंध करणाऱ्या लसी (Vaccine) आता उपलब्ध आहेत. या लशींचा डोस घेतल्यास कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते, असा दावा युनिव्हर्सिटी ऑफ मियामीच्या व्हायरॉलॉजिस्टनी केला आहे. जगभरात सुमारे 20 टक्के कॅन्सर विषाणूंमुळे होतात. एखाद्या व्यक्तीला विषाणूंचा संसर्ग झाल्यावर लगेच कॅन्सर होत नाही. परंतु, हे विषाणू संसर्गग्रस्त पेशींना (Cells) पेशी नष्ट होण्याची नैसर्गिक जैविक क्रिया कशी टाळायची हे शिकवतात. यामुळे, या पेशींमध्ये इतर बदल होतात आणि आगामी काही वर्षांत त्या कॅन्सरचं कारण ठरतात; मात्र लशींच्या मदतीने कॅन्सर रोखला जाऊ शकतो, असा दावा युनिव्हर्सिटी ऑफ मियामीमधले व्हायरॉलॉजिस्ट रोनाल्ड सी. डेसरोसियर्स यांनी केला आहे. याबाबत त्यांचा संशोधन अहवाल ‘द कन्व्हर्सेशन’वर प्रकाशित झाला आहे. याबाबत डेसरोसियर्स यांनी सांगितलं, की ‘विषाणू जिवंत पेशी आणि संसर्गग्रस्त व्यक्तींच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात, हे मायक्रोबायोलॉजिस्ट आणि विषाणू संशोधक म्हणून मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. हे विशिष्ट विषाणू रुग्णांना प्रभावित करण्याच्या आणि त्यांच्यावर उपचार करण्याच्या संभाव्य मार्गाच्या दृष्टीने अद्वितीय आहेत.’ हे वाचा- Supercomputer ने शोधले कोरोनाचे नवीन 9 विषाणू, इतर 100000 व्हायरसचाही शोध हिपॅटायटिस बी आणि ह्यूमन पॅपिलोमा विषाणूविरोधी लशींच्या मदतीनं अनेक व्यक्तींचा कॅन्सरपासून बचाव झाला आहे. ही बाब निर्विवाद सत्य आहे. तरीदेखील अनेक व्यक्ती लशीचा डोस नाकारतात. 2019 मध्ये, 13 ते 17 वयोगटातल्या 46 टक्के व्यक्तींना एचपीव्ही (HPV) प्रतिबंधक लसीकरण करण्यात आलं नव्हतं. परंतु या बाबतीत अमेरिका (US) इतर देशांपेक्षा चांगल्या स्थितीत आहे. जपानमध्ये (Japan) 2013 मधल्या प्रतिकूल घटनांच्या खोट्या अहवालांमुळे किशोरवयीन मुलांमध्ये लसीकरणाचा दर सध्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. लसीकरण मोहिमेमुळे कांजिण्यांचं निर्मूलन झालं आहे. पोलिओ (Polio), गोवर आणि इतर काही संसर्गजन्य रोगांचंही प्रभावीपणे उच्चाटन झालं आहे. त्यामुळे लसीकरणाच्या माध्यमातून एचपीव्ही आणि हिपॅटायटिस बीमुळे होणारा कॅन्सर टाळता येऊ शकतो. सर्व ज्ञात विषाणूंना 22 भिन्न फॅमिलीजमध्ये वर्गीकृत केले जाऊ शकतात. यांपैकी पाच विषाणू फॅमिलीज (Virus Families) एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाल्यानंतर आयुष्यभर त्याच्या शरीरात राहतात. त्यात असे सात ज्ञात विषाणू आहेत, की ज्यांमुळे कर्करोग होऊ शकतो. यापैकी पाच विषाणू हे पाच फॅमिलीजचा भाग आहेत, की जे शरीरात टिकून राहतात. यात ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजेच एचपीव्ही, एपस्टाइन बार, कपोसीचा सारकोमाशी संबंधित विषाणू, टी-लिम्फो ट्रॉपिक विषाणू आणि मर्केल सेल पोलिओमा विषाणूचा समावेश आहे. याशिवाय हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी (Hepatitis C) या दोन विषाणूंमुळेही कॅन्सर होतो. या विषाणूंचा संसर्ग झालेले बहुतेक जण संसर्गाशी लढण्यास आणि त्यांच्या प्रतिकारशक्तीद्वारे विषाणू नष्ट करण्यास सक्षम असतात. ज्या संसर्गग्रस्त व्यक्ती असं करू शकत नाहीत, त्यांना यकृताचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. विषाणूंमुळे होणारा कॅन्सर आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतो. हे वाचा- ‘Omicron चा धोका टळलेला नाही; निर्बंध हटवणं पडेल महागात’, WHO नं सांगितलं कारण एचपीव्ही संसर्ग आणि त्याच्याशी संबंधित कॅन्सरपासून संरक्षण करण्यासाठी पहिल्या प्रतिबंधक लशीचा वापर करण्यास अमेरिकेने 2006 मध्ये मंजुरी दिली होती. एचपीव्हीचा संसर्ग रोखण्यासाठी ही लस खूप प्रभावी असल्याचं दिसून आलं. ही लस सुरक्षित असून, तिचे दुष्परिणामही किरकोळ आहेत. ही लस वयाच्या 11-12व्या वर्षानंतर दिली जाऊ शकते आणि ती 10 वर्षं प्रभावी ठरते. त्याचप्रमाणे हिपॅटायटिस बी विषाणूची लसही दीर्घकाळासाठी उपयुक्त ठरली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या