Home /News /coronavirus-latest-news /

हे भीषण आहे! Supercomputer ने शोधले कोरोनाचे नवीन 9 विषाणू, इतर 100000 व्हायरसचाही शोध

हे भीषण आहे! Supercomputer ने शोधले कोरोनाचे नवीन 9 विषाणू, इतर 100000 व्हायरसचाही शोध

नेचर (Nature) या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सुपर कॉम्प्युटरने विविध नमुन्यांद्वारे 1 लाखांहून (Supercomputer Discovered 100000 New Viruses) अधिक विषाणूंचा शोध लावला आहे. यातील 9 विषाणू कोरोनाचे आहेत.

पुढे वाचा ...
लंडन, 01 फेब्रुवारी: गेल्या दीड ते दोन वर्षांपासून जगावर कोरोनाचं (Coronavirus Pandemic) संकट आहे. गेल्या काही महिन्यांत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने कमी होत असल्यामुळे कोरोनाचं संकट टळलं असं वाटत होतं; मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हॅरिएंट ओमायक्रॉनच्या रूपाने आला आणि त्याने (Coronavirus New variant Omicron) चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग अधिक गतीने होत असल्याचं दिसून येत आहे. यातच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नेचर (Nature) या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सुपर कॉम्प्युटरने विविध नमुन्यांद्वारे 1 लाखांहून (Supercomputer Discovered 100000 New Viruses) अधिक विषाणूंचा शोध लावला आहे. त्या विषाणूंपैकी 9 कोरोना विषाणू असल्याचं समोर आलं आहे. यापूर्वी कधीही न पाहिलेले हे कोरोनाचे प्रकार असल्याचं अहवालात म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या एका गटाने या संदर्भातल्या सुपर कॉम्प्युटरच्या माध्यमातून हे संशोधन पूर्ण केलं आहे. हे संशोधन नेचर या जर्नलमध्ये  प्रकाशित करण्यात आलं आहे. जैविक नमुन्यांद्वारे सुपर कॉम्प्युटरने एकूण 1.32 लाख RNA विषाणूंचा शोध लावल्याचं त्या अहवालात म्हटलं आहे. हे वाचा-देशभरातून दिलासा पण या राज्यात चित्र उलट! का वाढतेय कोरोनामुळे मृत्यूंची संख्या? संशोधक आर्टेम बाबैन यांनी म्हटलं आहे, की आपण विषाणूच्या अशा जगात जात आहोत, की जे जेनेटिकदृष्ट्या वेगळं आहे. प्राण्यांमध्ये अनेक प्रकारचे विषाणू असतात, हे आतापर्यंत समोर आलेल्या संशोधनातून सिद्ध झालं आहे. या चाचणीत आढळलेले हे 9 विषाणू भविष्यात मानवासाठी धोकादायक ठरू शकतात. विषाणूला ट्रेस करणं आणि त्याची उत्पत्ती कशी झाली, याबाबत माहिती देणं संशोधनामुळे सोपं होऊ शकतं. विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि औषधं बनवणाऱ्या औषध कंपन्यांनी या विषाणूवर उपचार शोधून काढावेत. असं केल्याने दुसऱ्या महामारीचा धोका निर्माण होणार नाही, असा सल्ला त्यांनी दिला. संशोधन अहवालानुसार, सुपर कॉम्प्युटरने सर्व नमुन्यांची चाचणी केली. यानंतर चाचणीत आढळलेल्या 1.32 आरएनए विषाणूंपैकी 15 हजार विषाणू शास्त्रज्ञांच्या परिचयाचे आहेत. यात कोरोनाचे 9 विषाणू सापडले आहेत. हे विषाणू नवे असून, याबद्दल कुणालाही माहिती नाही. या संशोधनात सामान्य रोग आणि साथीच्या रोगांवर अभ्यास केला जाऊ शकतो, असं संशोधकांना वाटतं. तसंच रोगांशी संबंधित अनेक प्रकारची महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. हे वाचा-Shocking! HIV रुग्णाच्या शरीरातच कोरोनामध्ये 21 बदल; संशोधकांनी व्यक्त केली भीती सुपर कॉम्प्युटरने 20 दशलक्ष गिगाबाइट एवढ्या डेटामधून या विषाणूंचा शोध लावला. हा डेटा जीन सिक्वेन्सिंगसाठी ठेवण्यात आलेल्या 50.70 लाख जैविक नमुन्यांमधून घेण्यात आला होता. संबंधित नमुने हे बर्फाखालून काढलेल्या नमुन्यांपासून प्राण्यांच्या विष्ठेपर्यंतचे होते. सध्याच्या या परिस्थितीमध्ये हा रिपोर्ट थोडा घाबरवणारा असला, तरी या विषाणूंवर आतापासूनच काम केलं, तर भविष्यातल्या संभाव्य साथी रोखण्यासाठी ते फायदेशीर ठरू शकतं.
First published:

Tags: Corona spread, Corona updates, Coronavirus, Virus

पुढील बातम्या