Home /News /coronavirus-latest-news /

'Omicron चा धोका टळलेला नाही; निर्बंध हटवणं महागात पडू शकतं', WHO नं सांगितलं कारण

'Omicron चा धोका टळलेला नाही; निर्बंध हटवणं महागात पडू शकतं', WHO नं सांगितलं कारण

फोटो सौजन्य - PTI

फोटो सौजन्य - PTI

डब्ल्यूएचओ अधिकारी मारिया वेन म्हणाल्या की, आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत की अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या लाटेचा पीक येणं बाकी आहे.

    नवी दिल्ली 02 फेब्रुवारी : जागतिक आरोग्य संघटना (WHO) जगातील सर्व देशांना कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराबद्दल (Omicron Variant) वारंवार चेतावणी देत ​​आहे. ही संघटना लोकांना सांगत आहे की धोका अद्याप संपलेला नाही. डब्ल्यूएचओनं पुन्हा एकदा म्हटलं आहे की जगातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनच्या लाटेचा उच्चांक येणं बाकी आहे. त्यामुळे कोरोना निर्बंध (Covid 19 Restrictions) हळूहळू शिथिल केले पाहिजेत. मंगळवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड-19 वर बनलेल्या टेक्निकल लिडने हा सल्ला दिला. देशभरातून दिलासा पण या राज्यात चित्र उलट! का वाढतेय कोरोनामुळे मृत्यूंची संख्या? ऑनलाइन ब्रीफिंगमध्ये, डब्ल्यूएचओ अधिकारी मारिया वेन म्हणाल्या की, आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत की अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या लाटेचा पीक येणं बाकी आहे. अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination) दर खूपच कमी आहे आणि या देशांतील असुरक्षित लोकसंख्येला कोविड-19 लस मिळालेली नाही. त्यामुळे अशावेळी सर्व बंधनं एकाच वेळी हटवू नयेत. मारिया वेन म्हणाल्या की, आम्ही नेहमीच सर्व देशांना कोविड-19 निर्बंध हळूहळू शिथिल करण्याचं आवाहन केलं आहे. कारण हा विषाणू शक्तिशाली आहे. WHOचे सरचिटणीस म्हणाले की, काही देशांमध्ये असा विश्वास वाढत आहे की लसीकरणाचे चांगले दर आणि ओमायक्रॉनच्या कमी प्राणघातकतेमुळे धोका टळला आहे. हा प्रकार निश्चितपणे अत्यंत सांसर्गिक आहे परंतु खूप घातक नाही, त्यामुळे अधिक घाबरण्याची गरज नाही. मात्र असा विचार करणं चुकीचं आहे. ते म्हणाले की संसर्ग वाढल्याने मृतांचा आकडाही वाढू शकतो. Shocking! HIV रुग्णाच्या शरीरातच कोरोनामध्ये 21 बदल; संशोधकांनी व्यक्त केली भीती पुढे ते म्हणाले, आम्ही असं म्हणत नाही की देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू केलं जावं. परंतु आम्ही सर्व देशांना आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या नागरिकांना कोरोनाशी संबंधित नियमांचं पालन करण्यास सांगावं. कारण या महामारीशी लढण्यासाठी केवळ लस हे एकमेव शस्त्र आहे असं नाही. कोरोना महामारीविरुद्धचे युद्ध आपण जिंकलं आहे, असा विचार करणं पूर्णपणे चुकीचं आहे, असेही ते म्हणाले.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona spread, Corona updates

    पुढील बातम्या