JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Breast surgery नंतर महिलेला झाला जीवघेणा आजार; आता उपचार करणंही अशक्य

Breast surgery नंतर महिलेला झाला जीवघेणा आजार; आता उपचार करणंही अशक्य

एका आजारावर मात करत महिलेने ब्रेस्ट सर्जरी केली आणि तिला दुसऱ्या आजाराने गाठलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 08 फेब्रुवारी : एका भयंकर आजारावर मात केल्यानंतर तिने सुटकेचा निश्वास टाकलाच होता. की पुन्हा एका भयंकर आजाराने तिला गाठलं. तिला दुसऱ्यांदा असा आजार झाला ज्यावर आता उपचार करणंही अशक्य आहे. यूकेतील महिला या भयंकर आजाराचा सामना करत आहे. आजाराचं निदान होताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. पण तरी ती हिंमत हरली नाही आहे. 50 वर्षीय मॅरी ब्लूम (Marie Bloom)  10 वर्षांपूर्वी तिला आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर  (Breast cancer) असल्याचं निदान झालं. डॉक्टरांनी तिला मॅस्टॅकटॉमी  (mastectomy) करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत ब्रेस्ट काढले जातात ज्यामुळे कॅन्सर शरीराच्या इतर भागात पसरत नाही. तिचा कॅन्सर तर नष्ट झाला. त्यानंतर डॉक्टरांनी तिला ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी करायला सांगतिलं (Britain woman shocking breast implant). ज्यामध्ये सिलिकॉन ब्रेस्ट लावले जातात. हे वाचा -  सावधान! ‘ही’ लक्षणं दिसत असतील, तर लगेच करा चाचण्या; असू शकतो पोटाचा कॅन्सर सर्जरीनंतर काही दिवसांनी तिला ब्रेस्टमध्ये पुन्हा सूज जाणवली. तिने ट्ेस करून घेतली. तेव्हा जे समजलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या ब्रेस्टमधील फ्लूएड काढण्यात आलं आणि तिला दुसऱ्या टाइपचा ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दुसऱ्यांदा झालेला हा ब्रेस्ट कॅन्सर तिला आधी झालेल्या ब्रेस्ट कॅन्सरमुळे पुन्हा झाला की त्यामागे दुसरं काही कारण होतं, हे सुरुवातीला समजलं नाही. नंतर डॉक्टरांनी तिला ब्रेस्ट इम्प्लांड सर्डरीमुळे तिचा कॅन्सर पुन्हा वाढल्याचं सांगितलं. तिला आधी झालेला कॅन्सर पहिल्या टप्प्यातील होता, त्यामुळे त्याच्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकत होतं. पण आता पुन्हा झालेला कॅन्सर खूपच दुर्मिळ असल्याचं डॉक्टरांनी सांगतिलं.  द सनच्या रिपोर्टनुसार तिला ब्रेस्ट इम्प्लांड असोशिएडेट एनाप्लॅस्टिक लार्ज सेल लिम्फोमा (BIA-ALCL) होतं. हा कॅन्सर ब्रेस्ट इम्प्लांटच्या चारही बाजूने स्कार टिश्यू कॅप्सूलमध्ये फ्लूएड जमा झाल्याने होतो आणि हा संपूर्ण शरीरात पसरू शकतो. हे वाचा -  बाळाच्या शरीरावर दिसल्या ‘जीवघेण्या खुणा’, डॉक्टरचं निदान ऐकून बसला धक्का मॅरी म्हणाली, मला झालेल्या कॅन्सरचं निदान झालं, यासाठी मी नशीबवान आहे, कारण कित्येकांना कॅन्सर झाला हे हेसुद्धा समजत नाही. इतर महिलांनी याबाबत जागरूक राहायला हवं.  या कॅन्सरबाबत समजताच तिने आपले ब्रेस्ट इम्प्लांट हटवले. त्यानंतर तिच्या कॅन्सरवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या