जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / बाळाच्या शरीरावर दिसल्या 'जीवघेण्या खुणा', डॉक्टरचं निदान ऐकून बसला धक्का; आईमुळेच वाचला चिमुरडा

बाळाच्या शरीरावर दिसल्या 'जीवघेण्या खुणा', डॉक्टरचं निदान ऐकून बसला धक्का; आईमुळेच वाचला चिमुरडा

बाळाच्या शरीरावर दिसल्या 'जीवघेण्या खुणा', डॉक्टरचं निदान ऐकून बसला धक्का; आईमुळेच वाचला चिमुरडा

महिलेला आपल्या एका महिन्याच्या मुलाच्या शरीरावर काही वेगळ्या खुणा (Deadly Tiny Mark On Body) दिसून आल्या. या खुणांकडे दुर्लक्ष न करता महिलेने डॉक्टराचा सल्ला घेतला आणि आपल्या बाळाचे प्राण वाचवले.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    आज संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. एकट्या कोरोनानेच (Coronavirus Pandemic) साऱ्या जगाच्या नाकीनऊ आणले आहेत. फक्त कोरोनाच नाही तर संपूर्ण जगात अनेक प्रकारचे आजार आहेत. काही आजार हे स्पष्टपणे जाणवतात. यात फ्लू (Flu) सारखे किंवा इतर कोणताही विशिष्ट प्रकारचे संसर्ग असतात. ज्यांचा प्रभाव स्पष्टपणे (Signs Of Diseases) दिसून येतो. पण, असेही काही आजार आहेत. ज्यांचा प्रभाव जाणवत नाही. शरीराराला ग्रासणाऱ्या काही रोगांची लक्षणं ही फारच कमी असतात. त्यामुळे ते निदर्शनासही येत नाहीत. असे आजार फार धोकादायक असतात. पण, सतर्क राहिल्यास आपण ते आजार ओळखू शकतो. नुकतंच एका महिलेने आपल्या एक महिन्याच्या मुलाला मृत्यूच्या दाढेतून खेचून काढलं आहे. संबंधित महिलेला आपल्या एका महिन्याच्या मुलाच्या शरीरावर काही वेगळ्या खुणा (Deadly Tiny Mark On Body) दिसून आल्या. या खुणांकडे दुर्लक्ष न करता महिलेने डॉक्टराचा सल्ला घेतला आणि आपल्या बाळाचे प्राण वाचवले. हे वाचा- अबू इब्राहिमच्या मृत्यूनंतर काय होणार इस्लामिक स्टेटचं? कोण असेल नवा नेता? @tinyheartseducation या नावाने इन्स्टाग्राम अकाउंट असलेल्या महिलेने आपल्या एका महिन्याच्या मुलाच्या पायाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या वागण्यात बदल झाला असून तो सतत रडत असतो. तसेच ताप नसतानाही त्याला उलट्या येत आहेत, असं महिलेने पोस्टमध्ये लिहलं. तसेच एकदा त्याने स्वतःच्या अंगावर उलटी केली. त्यावर मी त्याला अंघोळ घातली. तेव्हा त्याच्या अंगावर कोणत्या खुणा नव्हत्या. मात्र, रात्री त्याला मी पुन्हा अंघोळ घातली. तेव्हा मला त्याच्या पोटावर आणि पाठीवर छोटे पुरळ उठल्याचं दिसलं, असं महिलेनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं. यानंतर जेव्हा बाळाचे वडील त्याला तेल लावत होते. तेव्हा त्यांना बाळाच्या पायावर जांभळ्या रंगाच्या खुणा दिसल्या. या खुणा आधी त्याच्या पायावर नव्हत्या. त्यामुळे महिला घाबरून गेली आणि तिने लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. यानंतर डॉक्टरांनी बाळाच्या शरीरावर पडलेल्या खुणांचं कारण सांगिलं. जे धक्कादायक होतं. हे वाचा- किम जोंग पांढऱ्या घोड्यावर, नव्या सरकारी जाहीरातीत घेतलं ‘मसिहा’चं रूप डॉक्टरांनी सांगितले, की बाळाच्या शरीरावर पडलेले चट्टे हे meningococcal असून हा एक खूप गंभीर संसर्ग आहे. यामुळे meningitis आणि septicaemia हे गंभीर आजार होऊ शकतात. काही प्रकरणात तर हे दोन्ही आजार होतात. meningitis हा गंभीर आजार असून यामुळे 10 टक्के लोकांचा मृत्यू होतो. तर अनेक जण अपंग होतात. Meningitis Research Foundation च्या मते, meningococcal meningitis मुळे 10 पैकी 9 मुले 24 तासांच्या आत मरण पावतात. या प्रकरणात महिलेने बाळाच्या अंगावर दिसलेल्या खुणांकडे दुर्लक्ष केलं नाही, म्हणून बाळाला वेळेत औषधोपचार मिळाले आणि बाळ वाचलं. जर तुम्हाला आपल्या बाळाच्या अंगावर काही वेगळ्या खुणा दिसून आल्या तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात